राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा एकच एल्गार एकच मिशन-जुनी पेंशन
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा एकच एल्गार- एकच मिशन जुनी पेंशन !!
जुनी पेन्शन योजनेसाठी हजारो सरकारी कर्मचारी रस्त्यावर,बाईक रॅलीने लक्ष वेधले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
कोल्हापूर times 24 प्रतिनिधी
कोल्हापूर/मारुती फाळके
“एकच मिशन जुनी पेन्शन” कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, पेंशन आमच्या हक्काची….! हमारी युनियन हमारी ताकत” अशा घोषणा देत सरकारी कर्मचाऱ्यांनी बाईक रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा बुधवारी २१सप्टेंबर रोजी काढला,यावेळी हजारो शासकीय कर्मचारी घोषणा देत रस्त्यावर उतरले. २००५ पुर्वीचीजुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय बाईक मोर्चा काढण्यात आला. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवतिके यांना निवेदन दिले. गेली सतरा वर्ष हा लढा सुरू आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास कर्मचारी बेमुदत संप पुकारण्याच्या पावित्र्यात आहेत. त्या संपात नवीन कर्मचाऱ्यासह जुने कर्मचारी सहभागी होतील असा इशारा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य संघटक अनिल लवेकर यांनी दिला.
राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हक्काचे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन पुकारले होते. नवीन पेन्शन योजना एनपीएस कर्मचाऱ्यांच्या हिताचे नाही एमपीएससी अंतर्गत मिळणारे लाभाचे स्वरूप शाश्वती न देणारे आहेत त्यामुळे एनपीएस योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी ते कर्मचाऱ्यांच्या हिताचे आहे राजस्थान छत्तीसगढ गोवा या राजाने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्या करत कर्मचारी सकाळी साडेदहाच्या सुमारास रस्त्यावर उतरले.
एकच मिशन जुनी पेन्शन असा मजकूर लिहिलेल्या टोप्या परिधान करून बाईक रॅली काढण्यात आली दसरा चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील विविध मार्गावरून रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर सरकारी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य संघटक अनिल लवेकर नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. जिल्हा शाखाध्यक्ष वसंत डावरे, संजय क्षीरसागर, हाशमत हावेरी, संजीवनी दळवी, राजू गंधवाले, सुनील देसाई सतीश ढेकळे, नंदकुमार इंगवले, विठ्ठल वेलणकर, सुधाकर भादिंगरे, अनिल खोत, संदीप नलावडे, अखिल शेख धोंडीराम चव्हाण, गणेश तासगावकर, योगेश यादव, गव्हर्नमेंट बँकेचे रमेश घाटगे, संचालक विलास कुरणे, प्रकाश पाटील, संजय खोत, मनुजा रेनके,पल्लवी रेणके, शिक्षक बँकेचे संचालक सुनील एडके, शरद केनवडे, शिक्षक संघटनेचे सुधाकर सावंत उमेश देसाई, संजय पाटील, करण सरनोबत, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे,बालाजी पांढरे,श्रीनाथ पाटील,विश्वनाथ बोराटे,प्रमोद पाटील,मारुती पोवार,दीपक गायकवाड, संतोष जुगळे,कर्मचारी संघटनेचे नंदकुमार इंगवले, राजू आंबेकर, रमेश भोसले, बी.एस.खोत, उदय लांबोरेे, रामचंद्र रेवढे, सुनील देसाई, धोंडीराम चव्हाण, जयदीप कांबळेे, संतोष पांगम, गणेश आसगावकर, श्रीमंतिनी पाटील, विनोदकुमार भोंग यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना राज्य संघटक अनिल लवेकर म्हणाले,पेंशन हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा अधिकार आहे.महाराष्ट्र सरकारने छत्तीसगड, राजस्थान, गोवा सरकारच्या धर्तीवर लवकर जुनी पेंशन मंजूर करावी,अन्यथा यापुढे प्रभावी आंदोलनाचा अवलंब करण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचे जिल्हाअध्यक्ष मंगेश धनवडे म्हणाले,शासनाने लागू केलेल्या dcps व सध्याची nps या योजना तकलादू आहेत,यात भरीव मदत व भविष्याची कोणतीच विश्वासार्ह योजना नाही,dcps योजनेत गेलेल्या रकमेचा शासनाकडे हिशोब नाही,कर्मचाऱ्यांची कपात झालेली रक्कम व प्रत्यक्ष पावतीवरील रक्कम यात तफावत आहे.,असे असताना dcps ची रक्कम nps मध्ये कशी वर्ग होणार? या आंंदोलनात १००० पेक्षा जास्त बाईकस्वारांचा सहभाग होता.शासनाने सनदशीर मार्गाने सर्व केंडरच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेंशन लागू करावी.
मध्यवर्ती संघटनेच्या रॅलीत महत्वाच्या संघटना सहभागी झाल्या. यामध्ये जुनी पेन्शन हक्क संघटना, प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शाक्षक संघ, खाजगी प्राथमिक शिक्षक समिती, खाजगी प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना, सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, माजी सैनिक संघटना यांचा समावेश आहे.मध्यवर्ती संघटनेच्या ६२ वर्षाच्या इतिहासात प्रथमच बाईक रॅली, तसेच “सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा ” या एकमेव विषयासाठी आंदोलन झाले.










