March 26, 2026

श्री शिव शाहू फाऊंडेशन ला नेहमीच सहकार्याचा हात-छ.संभाजीराजे

0
IMG_20221004_110415

शाहूवाडी येथे शिव शाहू जीवनगौरव पुरस्कार आणि Super 30 Teachers Award प्रदान समारंभ संपन्न.
पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना जीवनगौरव पुरस्कार

कोल्हापूर/ मारुती फाळके

छत्रपती शाहूंच्या नावाने असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील उपक्रमशीलमशील शिक्षकांनी स्थापन केलेल्या आणि शिव शाहू यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे उत्कृष्ट काम करत असलेल्या श्री.शिव शाहू फाउंडेशन ला नेहमीच सहकार्य हात राहील,समाजाला दिशा देणारे हे काम आहे, असे प्रतिपादन श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी श्री शिव शाहू फाउंडेशन शाहूवाडी यांच्यामार्फत शिव शाहू जीवनगौरवव पुरस्कार आणि सुपर थर्टी टीचर्स अवॉर्ड प्रदान कार्यक्रम प्रसंगी केले. अध्यक्ष स्थानी शाहुवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील होते.

यावेळी बोलताना राजे म्हणाले शासनाने वीस पटाखाली शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे त्याला आपण सर्वजणांनी कडून विरोध करूया मी तुमच्यासोबत आहे वेळप्रसंगी आंदोलन करावे लागले तरी चालेल कारण मला आंदोलनाची सवयच आहे. पण हा निर्णय शासनास मागे घेण्यास भाग पाडू.समारंभाचे अध्यक्षस्थानी शाहूवाडी चे माजी आमदार श्री सत्यजीत पाटील आबा होते तर उद्योगपती व सामाजिक भान असणारे समाधान दूध संघाचे संस्थापक चेअरमन श्री.राहुल थोरात दादा . त्याचबरोबर युवराज संभाजी राजे यांचे विश्वासू सहकारी श्री.सुहास पाटील मा.नगरसेवक मलकापूर नगर परिषद यांची प्रमुख उपस्थिती होती.या दिमाखदार सोहळ्यात लोकप्रिय पोलीस उप अधीक्षक श्री.कृष्णात पिंगळे व वंचितांच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटणारे उमेद फाउंडेशन चे संस्थापक प्रकाश गाताडे यांना शिवशाहु जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या ३० शिक्षकांना सुपर थर्टी टीचर्स अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश नाईक व सुभेदार मेजर श्रावण यादव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शाहूवाडी येथील संकल्प सिद्धी हॉलमध्ये हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशाहु फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.संजय जगताप यांनी केले. यावेळी फाउंडेशनचेे संस्थापक अध्यक्ष हेमंत भालेकर, शिक्षक बँक संचालक आणि फाउंडेशन चे मार्गदर्शक शिवाजी रोडे पाटील, किरण शिंदे,प्रणिता तेली ,तानाजी वाघमोडे,नरेंद्र वरुडकर,जयदीप काळे, एस के पाटील, विक्रम पोतदार यांनी मनोगते व्यक्त केली.

 

अध्यक्षीय भाषणात माजी आमदार सत्यजित पाटील त्यांनी शिवशाहु फाउंडेशन करत असलेल्या कार्याचे कौतुक केले आणि पुढे नेहमीच फाउंडेशन सोबत राहणार असल्याचे सांगितले.श्री.शिव शाहू फाउंडेशन मार्फत श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.

यावेळी शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष रवी कुमार पाटील,सरचिटणीस सुनील पाटील, शिक्षण नेते रघुनाथ खोत, शिक्षक बँक संचालक सुनील एडके, विजय भोसले, शिक्षक बँक माजी व्हॉ.चेअरमन रामचंद्र मोहिते,अर्जुन जानकर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनील सुतार, संभाजी लोहार,मंडल कृषी अधिकारी महादेव जाधव आधी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवशाहु फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.संजय जगताप, संस्थापक अध्यक्ष हेमंत भालेकर, शिक्षक बँक संचालक शिवाजी शिवाजी रोडे पाटील, उपाध्यक्ष मधुकर पाटील, कार्याध्यक्ष फारूक आत्तार, कोषाध्यक्ष चंद्रशेखर जंगम, यशवंत शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सदाभाऊ कांबळे, शिवाजी रोडे पाटील गृहनिर्माण संस्थेचे व्हा.चेअरमन सर्जेराव काळे,श्री.सुनील सुतार पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री.एस.के.पाटील सौ.शोभा पाटील,नामदेव पाटील,नितीन जगताप,संजय आपटे, पांडुरंग माने,किरण शिंदे तौसिफ पटेल,बंडू घोळवे विश्वास माने,तानाजी वाघमोडे,प्रकाश डाकवे,दादा पाटील या शिवशाहु फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार गावडे आणि श्रीमती क्षमा जाधव यांनी केले तर आभार सचिव विक्रमपोतदार यांनी मांनले.

पुरस्कार प्राप्त शिक्षक खालील प्रमाणे
शाहूवाडी-
श्री.तानाजी रामचंद्र वाघमोडे, विद्या मंदिर मालाईवाडा,
श्री.मारुती भिवा गुरव, विद्या मंदिर शिरगाव,
श्री.जयदीप नारायण काळे, विद्या मंदिर थेरगाव,
श्री.संदीप बाजीराव गिरवले,विद्या मंदिर ओकोली,
श्री भगवान केरबा पाटील, विद्या मंदिर मालाई वाडा मी किरण रामचंद्र सुतार, विद्यामंदिर माण धनगरवाडा श्री.वसंत बेनीराम राठोड विद्यामंदिर थेरगाव, श्री. जयवंत खेतल विद्यामंदिर सावरेवाडी, श्री.संतोष कुमार माने विद्यामंदिर बोरमाळ धनगरवाडा
करवीर-
श्री.नरेंद्र उकंडराव वरुडकर, केंद्रशाळा वडकशिवाले,श्री.तुषार माणिकराव पाटील,केंद्र शाळा बोलोली,
सौ.प्रणिता चंद्रशेखर तेली, विद्या मंदिर आरळे,
श्री.रंगराव सदाशिव सूर्यवंशी, विद्या मंदिर खुपिरे
राधानगरी-
श्री.राजाराम चंद्रकांत ऱ्हायकर, विद्यामंदिर खामकरवाडी,
श्री.दत्तप्रसाद गुरुनाथ मोरस्कर, विद्यामंदिर हसणे धनगरवाडा
कागल
श्री.भरत तुकाराम कदम, पंडित नेहरू विद्या मंदिर वडगाव,
श्रीम. शुभांगी प्रकाश जाधव, विद्या मंदिर म्हाकवे
भुदरगड-
श्री.दत्तात्रय शंकर करवळ, विद्या मंदिर कलनाकवाडी
सौ.छाया महेश देसाई विद्या मंदिर अनफ खुर्द
आजरा-
सौ.धनवंती एकनाथ आजगेकर, शंकरलिंग विद्या मंदिर मडिलगे,
सौ.प्रीती रमेश कांबळे विद्या मंदिर मोरेवाडी
चंदगड-
सौ.वैशाली अशोक भोईटे,विद्या मंदिर कोरज,
श्री.सचिन आनंदा गवळी, विद्या मंदिर उत्साळी
शिरोळ-
श्री.शरद बापू सुतार, केंद्रशाळा दत्तनगर
,श्री. विनोद कुमार माने, कुमार विद्या मंदिर टाकळी,सौ.कांचन अरुण शिंगे, कुमार विद्यामंदिर दानोळी नंबर १
हातकणंगले-
श्रीम. पुनम शिवाजी चव्हाण केंद्र शाळा हेरले
श्री.संभाजी शिवराम साळोखे, वि.म. मानेनगर रेंदाळ,
श्री.विठ्ठल रघुनाथ ढवळे, विद्या मंदिर हेर्ले नंबर २
पन्हाळा- श्रीम.शिवनंदा धोंडीराम लहाने,विद्या मंदिर पोर्ले/ बोरगाव, श्री.संजय बाबुराव पाटील,विद्या मंदिर आळवे
गगनबावडा-
श्री.संजय राजाराम देसाई, विद्या मंदिर मणदूर श्रीम.विश्रांती आनंदा पोवार,विद्या मंदिर पाटीलवाडी नं. २
गडहिंग्लज-
सौ.सीमा बाळासाहेब पाटील
विद्या मंदिर सरोळी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!