March 26, 2026

शाहूवाडीत उद्या गायरान अतिक्रमण बचाव मोर्चा

0
IMG-20221110-WA0007

माजी आ.सत्यजित पाटील व रणवीरसिंग गायकवाड आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा

भेडसगाव/ मारुती फाळके

गायरानातील अतिक्रमणे कायम करण्यासाठी शाहूवाडीत उद्या शुक्रवार दि.11 रोजी माजी आ.सत्यजित पाटील व मानसिंगदादा गायकवाड गट आघाडीच्या वतीने गायरान अतिक्रमण बचाव मोर्चा शाहूवाडी पंचायत समिती कार्यालयावर काढणार असल्याची माहिती माजी बांधकाम आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील – भेडसगावकर यांनी दिली.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या गायरान क्षेत्रातील अतिक्रमणे 31 डिसेंबर 2022 पूर्वी काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून शासनाने अतिक्रमने कायम करण्यासाठी लोकसंख्यावाढ गृहीत धरून गावठाण विस्तारासाठी या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्या ऐवजी अतिक्रमण काढण्याचे नियोजन सुरू केले असून प्रशासकीय यंत्रणेला अल्टिमेटम दिला आहे. यामुळे राज्यासह शाहूवाडी तालुक्यातील लाखो कुटुंबे बेघर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या कठोर निर्णयाचा व राज्य शासनाच्या नाकर्तेपणाचा जाहीर निषेध करण्यासाठी व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

उद्या शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोजी पंचायत समिती शाहूवाडी येथे सकाळी अकरा वाजता तालु्क्यातील अतिक्रमणधारक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. या मोर्चाचे नेतृत्व मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील- सरूडकर,कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड,माजी सभापती हंबीरराव पाटील व अन्य नेत्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल. आघाडीच्या वतीने शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी मोर्च्याचे आयोजन केले असून सर्व अतिक्रमण धारकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!