सभासदांच्या सार्वभौम हितासाठी ॲड.रणजित कवाळे ना निवडून द्या
दि कोल्हापूर अर्बन को ऑप. बँक कोल्हापूर पंचवार्षिक निवडणुक
अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संचालक पदाचे स्वतंत्र उमेदवार
ॲड. श्री. रणजीत जनार्दन कवाळे
कोल्हापूर/ मारुती फाळके
कोल्हापूर ही सहकार क्षेत्राची पंढरी आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेतून समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत आर्थिक विकास पोचून त्याची प्रगती व्हावी, या दृष्टीने अनेक सहकारी बॅंका कोल्हापुरात स्थापन झाल्या. गरजूंना अर्थसहाय्य मिळू लागले. पण अलिकडच्या काळात बऱ्याच बॅंका अडचणीत येत आहेत. त्याला अनेक कारणे आहेत. चुकीचे कर्ज वाटप असो, की एनपीए.,व्यवहारातली अनियमितता असो की बदलत्या सहकार कायद्यातील अडचणीच्या तरतुदी.. अशा अनेक बाबी यासाठी कारणीभूत आहेत. म्हणूनच सहकार क्षेत्रातील संस्थांमध्ये अभ्यासू लोक पाठवणे ही काळाची गरज आहे. यासाठी दि कोल्हापूर अर्बन को ऑप. बँक कोल्हापूर च्या सध्या होऊ घातलेल्या निवडणूकित सभासदांच्या हितासाठी,त्यांची आर्थिक उन्नती व जास्तीचे आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी माझ्या मशाल या चिन्हासमोर शिक्का मारून सभासदांनी सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन
अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संचालक पदाचे स्वतंत्र उमेदवार
ॲड. श्री. रणजीत जनार्दन कवाळे यांनी केले आहे.
ॲड.कवाळे हे उच्च विद्याविभूषित,अभ्यासू उमेदवार म्हणून सशक्त पर्याय म्हणून उभे आहेत.कवाळे यांचे सामाजिक,सहकारातील ज्ञान चांगले असून नेहमी इतरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या या अभ्यासू व्यक्तिमत्वाचा त्यांच्या ज्ञानाचा सभासदांच्या हितासाठी चांगला फायदा होऊ शकतो.
कवाळे यांचे शिक्षण B.A, M.S.W,(PM & LW), LL.B.(Spl.) असून छ. शिवाजी विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमाच्या अर्थशास्त्र विषयात ते द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. विवेकानंद कॉलेजमध्ये त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणूनही उत्कृष्ट काम केले आहे.
सन २००२ पासून वकिली क्षेत्रात काम करत असताना कोल्हापूर जिल्हा वकील संघटनेच्या २००४-०६ या कालावधीकरिता कार्यकारिणी सदस्य म्हणून आणि २०१२-१४ या कालावधीत कोल्हापूर फौजदारी वकील संघाचे उपाध्यक्ष म्हणून संघटनेसाठी व सहकाऱ्यांसाठी अनेक उपयुक्त उपक्रम राबविले आहेत. याशिवाय विविध संस्था, सामाजिक संघटना, उद्योग, आस्थापना यावर ते कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत आहेत.
रणजीत कवाळे हे कायद्यातील तरतुदींची संपूर्ण माहिती असणारे उच्चशिक्षित व बँकेच्या सर्वांगीण प्रगतीकरता पूर्णवेळ देणारा संचालक म्हणून संचालक मंडळात निवडून जाणे, हे आजच्या घडीला अत्यंत महत्वाचे आहे. बॅंकेचा सुवर्णकाळ टिकवून ठेवण्यासाठी ॲड. श्री. रणजीत जनार्दन कवाळे यांना आपले बहुमोल मत देऊन संचालक म्हणून काम करण्याची व सभासदांची सेवा करण्याची त्यांना एक संधी द्यावी, ही सभासद बंधू भगिनींना नम्र विनंती..
असे आवाहन
ॲड. रणजीत जनार्दन कवाळे व प्रचार समितीने केले आहे.










