शिक्षणाधिकाऱ्यांची प्राथमिक शिक्षक बँकेस सदिच्छा भेट
शिक्षणाधिकाऱ्यांची प्राथमिक शिक्षक बँकेस सदिच्छा भेट
कोल्हापूर/मारुती फाळके:
‘शिक्षकांच्या प्रश्नांशी संबधित एकही फाईल येत्या सहा महिन्यामध्ये प्रलंबित राहणार नाही. सर्व प्रश्नांचा निपटारा केला जाईल’ प्रत्येक प्रश्ना बाबत प्राधान्यक्रम ठरवून प्रशासकीय कार्यवाही सुरू असून येत्या काळात प्रलंबित कामे मार्गी लावली जातील अशी ग्वाही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दिली.
शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी दि प्राथमिक शिक्षक बँकेस सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी, बँकेच्या कामकाजाची माहिती घेतली. बँकेच्या प्रगतीचे कौतुक केले.शिक्षकांच्या जीवनामधील आर्थिक स्थैर्य निर्माण करणाऱ्या बँकेच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले. बँकेचे चेअरमन सुनील एडके व व्हाइस चेअरमन शिवाजी बोलके यांनी स्वागत केले. याप्रसंगी शिक्षकांशी निगडीत वेगवेगळया प्रश्नांवर चर्चा झाली. पदोन्नती, स्थायित्वाचा लाभ, वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव, फंड पावत्या, डीसीपीस हिशोब, मेडिकल बिलाचे बजेट, शनिवार सोडून इतर दिवशी शिक्षण परिषद, रखडलेले मुख्याध्यापक प्रमोशन आदेश ,आदर्श शिक्षक कार्यक्रम ,जिल्हास्तरावर शिक्षक क्रीडास्पर्धा, शाहु पुरस्कार मध्ये शिक्षकांचा समावेश या सर्व बाबीवर सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन शिवाजी बोलके ,संचालक अर्जुन पाटील, बाळासाहेब निंबाळकर, राजेंद्र पाटील, शिवाजी रोडे-पाटील, बाळकृष्ण हळदकर, नंदकुमार वाईंगडे, बाबुराव परीट, अमर वरुटे, गजानन कांबळे, रामदास झेंडे, गौतम वर्धन, सुरेश कोळी, पद्मजा मेढे, सुरेश पाटील, अर्जुन जानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मगदूम, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर, शिक्षक संघ थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष रवी पाटील, रघुनाथ खोत,विलास चौगुले,सरचिटणीस सुनील पाटील, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तानाजी घरपणकर,संजय दाभाडे आदी उपस्थित होते.










