March 26, 2026

करुणा मोहीते यांना जिल्हा ‘आदर्श शिक्षिका’पुरस्कार जाहीर

0
IMG-20230911-WA0016

उपक्रमशील शिक्षिका करुणा मोहीते यांना जिल्हा ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कार जाहीर
(सांगली येथे आज पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण)

कोल्हापूर/मारुती फाळके

जिल्हा परिषद क्रेंद्र शाळा निगडी ता. शिराळा येथील विज्ञान विषय शिक्षिका करुणा बाबुराव मोहीते यांना सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा सांगली जिल्हा ‘आदर्श शिक्षिका’ सन २०२३- २४ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सोमवार ११ सप्टेंबर रोजी सांगली येथे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात दुपारी ३ वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

 

करुणा मोहीते यांचे डी. एड. पुर्ण झाल्यानंतर सन २०३ मध्ये माटेकरवाडी ता. कराड येथे शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर बिळाशी, किनरेवाडी येथे कार्यरत असताना शिक्षण क्षेत्रात चांगले काम केले.स्काऊट मेळाव्यात विद्यार्थीना परीक्षेला बसवून त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देत आहेत. विद्यार्थी, शिक्षक प्रशिक्षणात सातत्याने मार्गदर्शन करीत असतात. विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे शिष्यवृत्ती व मंथन परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थी दरवर्षी यश मिळवत आहेत. शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम, वृक्षारोपण आदी अनेक विधायक उपक्रमा बरोबरच, मॉडेल स्कूल साठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्या सध्या महिला आघाडी शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्ष, सांगलीच्या सामाजिक कल्याण एवं मानव विकास मंचच्या अध्यक्षा, गुणवत्ता विकास मंचच्या संयोजिका म्हणूनही काम पहात आहेत. आत्तापर्यंत त्यांनी

 

शिक्षण क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल
राज्यस्तरीय सावित्रीची लेक पुरस्कार , महाराष्ट्राची उपक्रम सम्राज्ञ पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार, स्व.सुषमा स्वराज पुरस्कार, सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, कोविड योध्दा पुरस्कार, आदर्श उपक्रमशील शिक्षिका, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, शिराळा तालुका आदर्श शिक्षिका आदी विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. त्यांना जाहीर झालेल्या या जिल्ह्या ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कारा बद्दल परिसरातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!