May 14, 2026

शिक्षक संघातर्फे आदर्श शिक्षकांचा गौरव

0
IMG-20230911-WA0017(1)

शिक्षक संघाचे राज्य सल्लागार राजाराम वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली  आदर्श शिक्षकांचा गौरव

कोल्हापूर/मारुती फाळके

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे राज्यस्तरीय व जिल्हा परिषदेने गौरविलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक नेते राजाराम वरुटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शाल, श्रीफळ, शिवचरित्र पुस्तक, बुके असे सत्काराचे स्वरुप आहे.जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. .

 

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सचिन देसाई तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नकुशी देवकर, जिल्हा परिषद पुरस्कारप्राप्त सरिता दत्तात्रय नाईक चंदगड ,पद्मश्री सुभाष गुरव गडहिंग्लज, स्नेहा रंजीत चव्हाण कागल, सायली संजय तांबेकर हातकलंगले, राजेंद्र हिंदुराव तोंदकर करवीर किरण दीपक सुतार पन्हाळा,कविता शंकर मगदूम शाहुवाडी , साताप्पा श्रीपाळ नेजे शिरोळ, संजय राजाराम देसाई गगनबावडा, आनंद वसंत चौगले राधानगरी, सुरेखा सुभाष नाईक आजरा, कविता विनायक चौगले भुदरगड आदींचा सत्कार करण्यात आला.

 

समारंभाला सुकाणू समिती सदस्य रविंद्र नागटीळे, वसंतराव जाधव, राजेंद्र जुगळे, *संघाचे पदाधिकारी बबन केंकरे, जि कर्मचारी सोसायटीचे संचालक श्रीकांत चव्हाण, बँकेचे माजी चेअरमन राजमोहन पाटील, प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे , साहेब शेख, जी एस पाटील, शिवाजी पाटील,बजरंग लगारे, दिलीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती

 

राज्य संघाचे कोषाध्यक्ष संभाजी बापट म्हणाले शिक्षक संघाने आपली परंपरा कायम राखत याही वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव केलेला आहे. शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप संघाच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. शिक्षक संघाचे मार्गदर्शक शिवाजी पाटील म्हणाले, ‘शिक्षकांनी नेहमी संघटने सोबत राहावे संघटनेमुळे शिक्षकांचे प्रश्न तडीस लागतात. आज शिक्षकांना त्यांच्या मेरिट नुसार पुरस्कार प्राप्त झाला आहे.’

राज्य सल्लागार वरुटे म्हणाले, ‘शिक्षक संघ नेहमी शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे जिल्हाआदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे काम कौतुकास्पद आहे .एक आदर्श शिक्षक म्हणून समाजामध्ये नावलौकिक मिळवला आहे. तसेच त्यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी ही आहे ही जबाबदारी त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडावी.’

 

शिक्षक् स्ंघाचे जिल्हाध्यक्ष बी. एस्. पाटील यांनी प्रास्ताविक केले. महिला आघाडीच्या अध्यक्षा श्वेता खांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रतिनिधी स्वरूपात सचिन देसाई, पद्मश्री गुरव, सायली तांबवेकर, स्नेहा चव्हाण यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सर्जेराव सुतार यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष बी एल शिंदे यांनी आभार मानले.

समारंभाला मनपा अध्यक्ष राजेंद्र पाटील, भुदरगड तालुकाध्यक्ष तानाजी धारपवार, करवीर तालुका अध्यक्ष सातापा चौगले, कागल तालुका अध्यक्ष तुकाराम राजुगडे, शिरोळ तालुका अध्यक्ष मदन कांबळे, पन्हाळा तालुका अध्यक्ष उत्तम पाटील, हातकलंगले तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण ,चंदगड तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष राजेंद्र मांडेकर, गगनबावडा सरचिटणीस श्रीपती तेली,पन्हाळा सरचिटणीस संजय ठाणेकर, नवनाथ व्हरकट,प्रताप राबाडे, सुनील मोरे, पांडुरंग रावण, दत्तात्रय एकशिंगे, करवीर कार्याध्यक्ष आर डी कांबळे, सुभाष मराठे, तानाजी इंदुलकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!