March 26, 2026

करवीर ता. प्राथमिक शिक्षक पतसंस्था आदर्शवत-आ.आसगावकर

0
20230911_220846

करवीर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे कामकाज आदर्शवत – आ. आसगावकर

करवीर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची ३९ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

कोल्हापूर/मारुती फाळके

सध्या सहकारात विविध आव्हाने असतानाही करवीर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने केलेले कामकाज आदर्शवत आहे. केवळ ९% व्याजाने कर्ज देणारी, सभासदांना १५ % डिव्हीडंड देते, उतरोत्तर संस्थेच्या व्यवसायात वृद्धी होत आहे,ही नक्कीच अभिनंदन व सहकाराला वृद्धी देणारी बाब आहे. असे प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले, ते संस्थेच्या ३९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.,

 

ते म्हणाले संस्थेच्या वतीने सेवानिवृत्त सभासदांचा होणारा सन्मान ही सभासदांप्रती कृतज्ञता आहे .संस्थेने आर्थिक व्यवहाराबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमातही योगदान द्यावे,भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्वनिधी उभारण्यावर भर द्यावा, ठेवीदारांचा विश्वास दृढ होईल,असेच कामकाज अविरत सुरू राहावे.

प्रास्ताविकात संस्थेचे चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. ते म्हणाले ,सात कोटी ठेवी वाढल्या असून सहा कोटीच्या वर कर्ज वाटप झाले आहे.कर्ज वसुलीसाठी केलेल्या विशेष प्रयत्ना मुळे एनपीचे प्रमाण कमी झाले आहे. संस्थेला या आर्थिक वर्षात 25 लाख रुपयांचा नफा झाला असून आगामी काळामध्ये आगामी उद्दिष्टामध्ये 50 कोटी ठेवींचा टप्पा व संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय विचाराधिन आहे.,पारदर्शी व्यवहार आणि कर्ज वसुलीच्या धोरणामुळे ठेवी व व्यवसायमध्ये वाढ झाल्याचे ते म्हणाले.

 

यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी,गुणवंत पाल्य,आदर्श शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील, विस्ताराधिकारी शिवाजी मानकर, प्रकाश आंग्रे, व्हा. चेअरमन शशिकांत धोत्रे, सुरेश कोळी, कृष्णात कारंडे, दिपाली भोईटे, वर्षा केनवडे,सुकुमार मानकर,संदीप मगदूम,धनाजी सासणे, यशवंत चौगुले, धनाजी पाटील, राजेंद्र तोंदकर, दीपक पाटील,प्रताप पाटील, बाळासाहेब कांबळे,सचिन पावसकर,मंगल चौगुले, तज्ञ संचालक राजेश सोनपराते ,सलीम जमादार, तसेच शिक्षक बँकेचे चेअरमन सुनील एडके, अर्जुन पाटील, ज्योतीराम पाटील, प्रमोद तोंदकर, प्रभाकर कमळकर ,राजीव परीट, राजेंद्र पाटील,बाजीराव पाटील, रामदास झेंडे,शिवाजी बोलके,बाळासाहेब निंबाळकर, सुनील पाटील, शिवाजी रोडे -पाटील, पद्मजा मेढे, गजानन कांबळे, गौतम वर्धन, संजय कुर्डूकर, बाबासाहेब धुमाळ, धनाजी पाटील , हरीदास वर्णे, बाजीराव पाटील,दत्ता शिंदे भगतसिंग कणसे, हिंदुराव परीट, विश्वास चव्हाण, मारुती लांबोरे, शिवाजी लव्हटे,शरद केनवडे, मधुकर जाधव, संजीव थोरात, दिलीप खाडे, सूर्यकांत पाटील, दिलीप पाटील, महादेव किल्लेदार,संतोष गायकवाड,शिवतेज बाजारी ,दत्ता शिंदे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश घोटणे, स्वागत धनाजी पाटील तर आभार शशिकांत धोत्रे यांनी मांडले.,सभेस सभासद,पाल्य,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!