यु डायस बाबत एकच पोर्टल विकसित करा -भरत रसाळे
यू डायस प्लस पोर्टल व सरल पोर्टल यांची माहिती स्वतंत्रपणे भरणे ऐवजी एकच पोर्टल विकसित करण्याबाबत शिक्षण संचालक पुणे यांना निवेदन-भरत रसाळे
कोल्हापूर/ मारुती फाळके
यू डायस प्लस पोर्टल व सरल पोर्टल यांची माहिती स्वतंत्रपणे भरयाऐवजी एकच पोर्टल विकसित करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक मा. शरद गोसावी साहेब यांच्याकडे महाराष्ट्र राज्य खा .प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने करण्यात आली समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचाल मा महेश चोथेसाहेब यांना देण्यात आले .
या निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्र शासनाने गेली अनेक वर्षे सरल पोर्टल विकसित केले असून या पोर्टलवर दरवर्षी शाळा,विद्यार्थी , शिक्षक संच मान्यता व आधार अशा विविध प्रकारची माहिती अद्यावत केली जाते.
तथापि गतवर्षीपासून विद्यार्थ्यांची माहिती स्वतंत्रपणे यु डायस प्लस पोर्टलवर भरण्यासाठी नवीन पोर्टल विकसित केली आहे . चालू वर्षी तर या पोर्टलवर सरल पोर्टलवरील विद्यार्थी देवाणघेवाण , आधार व्हॅलिडीटी चे कामकाज पद्धतीने दिनांक ३१ ऑक्टोबर २३ पर्यंत पूर्ण करण्यास कळवले आहे .मुळातच प्रत्येक शाळेमध्ये शिक्षकांची अपूरी संख्या आणि हे एकच काम दुहेरी पद्धतीने करावे लागणे यामुळे अध्यापन ऐवजी या कामातच वेळ जातो . त्यामुळे अशी दोन पोर्टल विकसित करण्यापेक्षा एकच पोर्टल विकसित करून माहिती संकलित करावी ,जेणेकरून माहिती भरण्याची प्रक्रिया सुलभ होईल व शिक्षकाचा वेळ वाचून अध्यापन करण्यासाठी वेळ मिळेल . तरी आपले स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी . अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे . मा शिक्षण उपसंचालक सो यांनी हे निवेदन आपल्या शिफारसीसह तात्काळ मा . शिक्षण संचालक (प्राथ) पुणे यांचे कडे कार्यवाही साठी पाठवलेले आहे,असे भरत रसाळे यांनी कोल्हापूर टाइम्स 24 शी बोलताना सांगितले.
मा शिक्षण उपसंचालक कोल्हापूर ‘यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्यासह शिवाजी सोनाळकर , आप्पासाहेब वागरे .सर्जेराव नाईक इत्यादी उपस्थित होते.










