March 26, 2026

जि.प.कर्मचारी सोसायटीतर्फे सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार -चेअरमन रणजीत पाटील

0
images

जि प कर्मचारी सोसायटीच्या वतीने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार – चेअरमन रणजीत पाटील

कोल्हापूर/मारुती फाळके

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या वतीने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी सहकारी लिमिटेड कोल्हापूर मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन रणजीत पाटील व व्हा. चेअरमन मुज्जमिल नावळेकर यांनी दिली.

 

ते म्हणाले,सन २०२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती, जवाहर नवोदय विद्यालय ,सातारा सैनिक स्कूल निवड, इयत्ता दहावी बारावी परीक्षा, सीईटी,नीट परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या तसेच एमपीएससी व यूपीएससी परीक्षेमध्ये निवड झालेल्या तसेच राज्य स्तरावर वैयक्तिक कला,क्रीडा क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सभासद पाल्यांचा सत्कार कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीचे वतीने चेअरमन रणजीत पाटील,व्हा. चेअरमन मुजम्मिल नावळेकर, व व्यवस्थापक व्ही एन.बोरगे यांनी कळविले आहे.

 

या कार्यक्रमासाठी सभासदांनी आपल्या पाल्यांच्या गुणपत्रकाच्या – प्रमाणपत्रकाच्या सत्य प्रतिसह एक आयकार्ड साईज रंगीत फोटो जोडून पत्ता व फोन नंबरसह संस्थेकडे २० ऑक्टोंबर च्या पूर्वी अर्ज करावेत असे आवाहन संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ सुकानु समिती यांच्याकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!