March 14, 2026

चेतन मोटर्स मध्ये फोर व्हीलर इलेक्ट्रिक वाहन टाटा SEV चे अनावरण

0
Screenshot_20231016_194254_2--800

चेतन मोटर्स मध्ये फोर व्हीलर इलेक्ट्रिक वाहन टाटा SEV चे अनावरण मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांची माहिती

कोल्हापूर / मारुती फाळके

चेतन मोटर्समध्ये टाटा एसईव्हीचे अनावरण गांधीनग्र पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील व कोल्हापूर येथील सहायक मोटार वाहन निरीक्षक मंगेश गुरव यांच्या हस्ते झाले. कमर्शियल प्रकारातील भारतातील हे पहिलंच आहे. हे वाहन छोटा हत्ती म्हणूनही ओळखलं जाते.

 

नवीन इलेक्ट्रिक वाहनात २१.३ केडब्ल्यूइचची बॅटरी बसवण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये १५४ किमी अंतर टाटा एस पार करते. टाटा मोटर्सच्या चार्जिंग पॉइंटवर टाटा एस १०५ मिनिटांत संपूर्ण चार्जिंग होते, तर घरच्या घरी पूर्ण चार्ज होण्यासाठी टाटा एसला सात तास लागतात.
टाटा एसईव्हीच्या बॅटरीवर पाणी, धूळ, चिखल याचा कोणताही परिणाम होत नाही, जेणेकरून कोणत्याही हवामानात ही गाडी वापरणे सोयीचं आहे. टाटा मोटर्सने टाटा एस इव्ही डिलिव्हरी व्हॅनच्या रुपात बनवली आहे. यामध्ये 600 किलो पर्यंत माल वाहतूक करण्याची क्षमता आहे. नवीन टाटा एस इव्ही ही सर्वार्थाने छोट्या वाहतूक व्यावसायिकांच्या फायद्याची आहे.

 

चेतन मोटर्सच्या मुडशिंगी येथील शोरूमला भेट देऊन टाटा एस इव्हीची टेस्ट ड्राइव्ह घ्यावी व बुकींग करावे. बुकींग करणाऱ्यांना आकर्षक व्याजदरात फायनान्स पण उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी दिली आहे. यावेळी टाटा मोटर्सचे सर्विस हेड रविंद्र मोहिते, प्रविण आसबे, बाळासाहेब शेळके, रविंद्र पाटील (सडोलीकर), सलिम हुदली, नितीन साटम, किशोर बिडकर, अमोल नेर्ले यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!