खाजगी प्रा.समितीचे पुरस्कार वितरण मंगळवारी- भरत रसाळे
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची शिक्षण परिषद व शिक्षण जागर पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी
कोल्हापूर टाइम्स प्रतिनिधी
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची शिक्षण परिषद व शिक्षण जागर पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी
कोल्हापूर ..५ ऑक्टोबर या जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून ” शिक्षण जागर ” हा पुरस्कार दिला जातो . यावर्षीच्या ‘शिक्षण जागर ‘ पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान आणि “शाळा व एस .टी . वाचलीच पाहिजे “या विषयावरील शिक्षण परिषद मंगळवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी कै . राम गणेश गडकरी हॉल पेटाळा कोल्हापूर या ठिकाणी सायं ठीक ५ वाजता संपन्न होत आहे .
या शिक्षण परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक मा. शरद गोसावी यांच्या शुभहस्ते होणार आहे .या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार मा विक्रम काळे व शिक्षक आमदार प्रा . जयंत आसगावकर आणि कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे हे उपस्थित राहणार आहेत तर मान्यवर पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी मीना शेंडकर प्रशासनाधिकारी एस. के . यादव वेतन पथक अधीक्षक वसुंधरा कदम ,प्राचार्य प्रभाकर हेरवाडे व प्रा . डॉ . भारत खराटे हेअसणार आहेत . या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भारत रसाळे हे भूषवणार आहेत .तरी या शिक्षण परिषद आणि सत्कार सोहळ्याच्या भव्य कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षण प्रेमीनी उपस्थित रहावे असे आवाहन राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केले आहे.










