May 14, 2026

नसीम बापूसो मुल्ला यांना PHD

0
IMG-20231120-WA0077

नसीम बापूसो मुल्ला यांना PHD

कोल्हापूर टाइम्स 24 प्रतिनिधी:

          जिल्हा परिषदेच्या विद्या मंदिर सोमवार पेठ ता.पन्हाळा या शाळेतील शिक्षिका नसीम बापूसो मुल्ला यांनी समाजशास्त्र विषयांतर्गत शिवाजी विद्यापीठाची पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यांनी कला, वाणिज्य, विज्ञान कोवाड महाविद्यालयातील डॉ खंडेराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर शहरातील मुस्लिम स्त्रियांचा अभ्यास या विषयावरील शोधनिबंध विद्यापीठात सादर केला.

मुल्ला या उपक्रमशील शिक्षिका असून विविध शैक्षणिक उपक्रमात त्या अग्रेसर असतात. तसेच त्या शि.द.पाटील शिक्षक संघ गटाच्या महिला कार्यकारिणी मध्ये जिल्हा कोषाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.

या संशोधन कामी त्यांना शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ प्रतिमा पवार, डॉ प्रतिभा देसाई ,प्राचार्य आर के शानेदिवाण ,डॉ माने यांच्यासह पती बापूसो मुल्ला आदींनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!