‘कास्ट्राईब’चे कार्य समाजाला दिशा देणारे- आ.जयंत आसगावकर
‘कास्ट्राईब’ शिक्षक संघटनेचे कार्य समाजाला दिशा देणारे- आ.जयंत आसगावकर
कास्ट्राईबच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण
शाहू स्मारक मध्ये रंगला सोहळा
कोल्हापूर/ मारुती फाळके
क्रांतीबा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी समाजात आदर्श काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करून शिक्षण व्यवस्थेला ऊर्जा देणारे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे असे प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी व्यक्त केले ते शाहू स्मारक येथे शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे महासचिव नामदेवराव कांबळे होते.
आसगावकर म्हणाले,शिक्षण प्रक्रियेतील सध्याची स्थित्यंतरे स्वीकारून शिक्षक बदल स्वीकारत आहेत,पण शासनाचे काही जाचक,अहिताचे निर्णयाला सातत्याने विरोध करून बहुजनांचे शिक्षण टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.याकामी राज्यात कास्ट्राईब संघटनेचे कार्य उल्लेखनीय आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते प्रा.डॉ.अरुण शिंदे म्हणाले,प्रगत देशांची शिक्षणप्रणाली स्वीकारून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बदल व्हावेत,गोरगरिबांचे शिक्षण टिकवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी संघटित लढा उभे करण्याची गरज आहे., देशातील निवडणुका जेव्हा शिक्षण या मुद्द्यावर होतील तेव्हाच विकसनशीलतेचा प्रवास विकासाकडे मार्गक्रमण करेल.
यावेळी आकाश तांबे म्हणाले, संघटना राज्यस्तरावर मागासवर्गीयांच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवत आहे.,महापुरुषांच्या विचारांचा वारसा नवोदित पिढीने नेटाने चालवण्याची गरज आहे.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना नामदेवराव कांबळे म्हणाले, महात्मा फुले उत्कृष्ट शेतकरी, व्यापारी,ठेकेदार,साहित्यिक समाजसुधारक, आदर्श शिक्षक या भूमिकेतून त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला.,यावेळी जिल्ह्यातील उपक्रमशील १५ शिक्षक आणि विशेष कार्य करणाऱ्या ८ गुणिजनांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी,शिक्षण उपसंचालक महेश चोथे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी मनोगते व्यक्त केली,कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक गौतम वर्धन तर आभार संजय कुर्डुकर यांनी म्हणाले.,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मगदूम व वैभव प्रधान यांनी केले.
आदर्श शिक्षक पुरस्कार व विशेष पुरस्कार विजेते-
दिनकर बाळासो परीट, राजेंद्र धोंडीराम जाधव – करवीर,
मनीषा नागेश सुतार, अमीत नागेंद्र मुंजारे -आजरा,
अशोक भाऊ कांबळे , बाबासो आनंदा कांबळे –
राधानगरी,सुरेश सदाशीव जाधव -हातकणंगले,
सुखदेव सोपाना कदम – पन्हाळा,
तानाजी जयराम कांबळे – गडहिंग्लज
अमीत मधुकर मेधावी – गगनबावडा,
अश्विनी अंकुश कांबळे – भुदरगड,
बापू शिवराम सोरटे – शाहूवाडी .
महादेव कृष्णा कांबळे – शिरोळ,
श्रीकांत बाळू कांबळे- कागल,
अनंत सटूप्पा कांबळे – वि मं ढेकोळी -चंदगड
विशेष पुरस्कार- कु . ऐश्वर्या दयानंद जाधव – उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार ( विम्बल्डन लॉन टेनीस ),अन्वी चेतन घाटगे – उत्कृष्ट जागतीक बाल गिर्यारोहक , संदिप सुदाम कांबळे – उत्कृष्ट बौद्धाचार्य
मिलींद सुनित चंद्रमणी – कृषी उपसंचालक वर्ग -1 MPSC तुन निवड,आदित्य दिनकर जगदीश – PHD – Agree .. श्रीधन विनायक प्रधान – AIIMS – रायपुर MBBS निवड. दिव्या दयानंद कांबळे – AllMS – नागपूर MBBS निवड धैर्यशील दयानंद कांबळे – IIser – इंडीयन रिसर्च इन्स्टिट्यूट भोपाळ – निवड.
कार्यक्रमास तुकाराम संघवी, पि डी सरदेसाई, यशवंत सरदेसाई, ए एल कांबळे, सुखदेव कदम, विजय कांबळे, अशोक कांबळे, तानाजी घसते, राखी तारळेकर,विद्या कांबळे, हेमलता कुर्डूकर, सुनंदा जगदीश, अस्मिता साबळे, आकाराम कांबळे, जनार्दन कोतेकर, दयानंद म्हेत्तर, वसंत देसाई, बी एस कांबळे, डी एस कौशल, गणपत गायकवाड, दिनकर जगदीश, विनायक प्रधान, विलास जाधव, एम एस कांबळे, सुरेश कदम, सहदेव कांबळे, बाजीराव कांबळे, छाया वर्धन, डि के कांबळे, मनीष कांबळे ,विजय कांबळे ,सुरेश देशमुख, जी के कांबळे, बाबासाहेब सोरटे, सदाशिव कांबळे, सर्जेराव कांबळे, रमेश कांबळे, भीमराव तराळ, मधुकर जरळी, नंदकुमार कांबळे आदीसह शिक्षक, संघटनेचे कार्यकर्ते,सत्कारमूर्तीचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










