“जुनी पेंशन” साठी १ वाजता मोर्चात बहुसंख्येने उपस्थित रहा- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना
जुनी पेन्शन लागू करा , खाजगीकरण व कंत्राटीकरण रद्द करा
“जुनी पेंशन” साठी १ वाजता मोर्चात बहुसंख्येने उपस्थित रहा- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना
कोल्हापूर/मारुती फाळके
जुनी पेन्शन लागू करा , खाजगीकरण व कंत्राटीकरण रद्द करा , या प्रमुख मागणीसाठी आज शनिवार दोन डिसेंबर रोजी सहकुटुंब मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षक मध्यवर्ती संघटना समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला .,या मोर्चासाठी आज दुपारी १ वाजता ऐतिहासिक टॉउन हॉल बाग येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी व मध्यवर्ती शिक्षक संघटना समन्वय समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी ,यासाठी मार्च महिन्यामध्ये सात दिवस बेमुदत आंदोलन करण्यात आले होते.परंतु यावर कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे , येत्या शनिवारी जुनी पेन्शन लागू करा , कंत्राटीकरण व खाजगीकरण रद्द करा या मागणीसाठी सहकुटुंब मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापुरातील टाऊन हॉल या ठिकाणाहून दुपारी ठीक एक वाजता मोर्चाला सुरुवात होणार असून , दसरा चौक , व्हीनस कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे .
तरी जिल्ह्यातील सर्व सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी , आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या प्रमाणात या मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन , राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे नेते अनिल लवेकर व वसंत डावरे यांनी केले आहे.
बैठकीत पुरोगामी शिक्षक संघटनेचे प्रसाद पाटील ,शिक्षक समितीचे उमेश देसाई ,खाजगी शिक्षक महासंघाचे राजेंद्र कोरे , शिक्षक सेनेचे संतोष आयरे , शिक्षक संघाचे दिलीप माने यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली.
बैठकीला सुरेद्र तिके ,नंदकुमार इंगवले, योगेश जंगम , राहूल शिंदे, संजय क्षीरसागर , नितीन कांबळे , अनिल कांबळे , सुनिल देसाई , सौ हशमत हावेरी , धोंडीराम चव्हाण , संदिप कांबळे , शिवाजी भोसले , अशोक वरुटे , रमेश भोसले , शिवाजी सोनाळकर , उमेश सावंत , अमोल राऊत , गणेश आसगांवकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.










