May 14, 2026

‘जुनी पेंशन’साठी पुन्हा संपाचा इशारा..कोल्हापुरात मोर्चाद्वारे वेधले लक्ष!

0
IMG-20231202-WA0087(1)

जुनी पेन्शनसाठी हजारो शिक्षक-सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा वज्रनिर्धार!

२० मार्चच्या मुख्यमंत्री यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी पुन्हा संपाचा इशारा

एकच मिशन – जुनी पेन्शन !!

कोल्हापुरात एकवटले हजारो राज्य सरकारी कर्मचारी

कोल्हापूर/मारुती फाळके

२० मार्चच्या मुख्यमंत्री महोदय यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी व आठवण झाली नाही तर दि.१४ ते २० मार्च २०२३ चा स्थगित केलेला संप यापुढे पुन्हा संपाचा इशारा एकच मिशन जुनी पेन्शन” असा नारा देत हजारो शिक्षक आणि सरकारी कर्मचारी शनिवारी रस्त्यावर उतरले. टाऊन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत मोर्चा काढून जुन्या पेन्शनसाठीचा लढा आणखी बुलंद केला. या मोर्चामध्ये सरकारी कर्मचारी व शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत बोलताना जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक अनि लवेकर यांनी, “जुनी पेन्शन योजने संदर्भात सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर या महिन्यापासूनच सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जातील.”असा इशारा दिला.

 

शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी सरकारवर हल्लाबोल करताना, “सरकारी कर्मचारी व शिक्षकांच्या आणि हक्कासाठी रस्त्यावरची लढाई करताना सभागृहातील आवाज उठवू.” असा इशारा दिला.
सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली शनिवारी मोर्चाचे आयोजन केले होते. शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांच्या मिळून पन्नासहून अधिक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. “एकच मिशन जुनी पेन्शन”असा नारा देत दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास टाऊन हॉल येथून मोर्चाला सुरुवात झाली. वेगवेगळ्या सरकारी कार्यालयातील कर्मचारी, संघटना प्रतिनिधी, शिक्षक यांनी जोरदार घोषणा देत मोर्चाचा मार्ग दणाणून सोडला.

 

आमदार जयंत आसगावकर, निमंत्रक अनिल लवेकर हे मोर्चाच्या अग्रभागी होते. या मोर्चामध्ये सरकारी कर्मचारी संघटनेचे वसंत डावरे, संजय क्षीरसागर, शैक्षणिक व्यासपीठाचे एस.डी. लाड, भरत रसाळे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे एम एम पाटील, एम एम भाट, महसूल कर्मचारी संघटनेचे राहुल शिंदे, लखन खाडे, रमेश भोसले,गव्हर्नमेंट बँकेचे अध्यक्ष अतुल जाधव उपाध्यक्ष अजित पाटील, संचालक संजय खोत, प्रकाश पाटील, मनुजा रेणके, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील,,जिल्हाध्यक्ष एस के पाटील, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बी एस पाटील, प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे, मारुती दिंडे,सर्जेराव सुतार,पेंशन संघटनचे जिल्हाध्यक्ष संदीप पाडळकर, सरचिटणीस बाजीराव पाटील,शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर, हरिदास वरणे,सचिन कोल्हापुरे, जुनी पेंशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, सरचिटणीस विजय रामाणे, कार्याध्यक्ष बालाजी पांढरे, निलेश कारंडे,मारुती फाळके,शिक्षक बँक संचालक अमर वरुटे जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे कुमार कांबळे, राणी शिरसाठ, नर्सिंग संघटनेच्या संघटनेच्या मंगल पाटील हाश्मिता हावेरी, शिक्षक संघटनेचे राजेश वरक, राजेंद्र पाटील, दिलीप माने, विजय सुतार, राहुल बागडे, संध्या कोरे, वैशाली पाटील, सुधाकर सावंत, उमेश देसाई, राजेंद्र कोरे, अंकुश रानमळे सचिन पाडळकर, शिवाजी गुरव, प्रकाश गावडे पाटबंधारे विभागातील राजेंद्र गंधवाले विक्रम राजपूत, अनिल खोत, आदींचा सहभाग होता.

मोर्चा टाऊन हॉल, सीपीआर चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. “जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, जो पेन्शन की बात करेगा वही राज करेगा, शाळांचे खाजगीकरण रद्द करा, कंत्राटीकरण रद्द करा.” अशा घोषणा दिल्या जात होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी बोलताना निमंत्रक अनिल लवेकर म्हणाले, “जुनी पेन्शन व सरकारी कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्या संदर्भात आमचा लढा सातत्याने सुरू आहे. सरकारने याकडे सकारात्मकतेने पाहून निर्णय घ्यावा. जुनी पेन्शन योजनेच्या निर्णयास विलंब लागला तर सरकारी कर्मचारी या महिन्यापासूनच बेमुदत संपावर जातील.”

 

दरम्यान आमदार जयंत आसगावकर म्हणाले, “सरकारने जुनी पेन्शनचा विषय मार्गे लावावा या प्रश्नी चालढकल करू नये. जुनी पेन्शन संदर्भात सरकारने नेमलेल्या समितीचे कामकाज शंकास्पद वाटत आहे. शिक्षक व सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेसाठी रस्त्यावरच्या लढाई सोबतच सभागृहात देखील आवाज उठवू.” यानंतर सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!