May 14, 2026

खाजगी शाळांतील शिक्षक कर्मचार्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून -भरत रसाळे

0
IMG-20231221-WA0015

खाजगी शाळांतील शिक्षक कर्मचार्यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून – भरत रसाळे

संघटनेच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर/प्रतिनिधी

खाजगी शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँकेतून वेतन घेण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथ शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली आहे . भरत रसाळे यांनी दिलेल्या निवेदनांत म्हंटले आहे की , कांही मोजक्या जिल्ह्यांमध्येच शाळांचे वेतन राष्ट्रीय कृत बँकेमार्फत होते अन्य खाजगी प्राथ. शाळांचे वेतन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामार्फत होते. पण राष्ट्रीयकृत बँकानी पगारदार नोकरांच्या साठी कर्ज , विमा, ओव्हरडॉफ्ट , झिरो बॅलेन्स सेवेबरोबर बँकाच्या इतर ऑनलाईन सुविधा मोफत देण्याचे धोरण आखले आहे त्यामुळे अशा बँकातुन पगार झालेस शिक्षक कर्मचार्यांना या सुविधांचा लाभ मिळणार आहे तसेच सध्या कोषागार कार्यालयामार्फत “कॅश मॅनेजमेंट पोर्टल ( CMP ) प्रणालीद्वार वेतन आहरित केले जात असलेने ते थेट शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या खात्यांवर जमा होते .

वेतनपथकांनाही आवांतर कामाचा ताण पडत नाही त्यामुळे संघटनेच्या वतीन दोन महिन्या पूर्वीच माहे ऑक्टो.2023 मध्ये राज्यशासन आणि मा .शिक्षण आयुक्त, मा .शिक्षण संचालक आणि मा . शिक्षण उपसंचालक यांना निवेदन देऊन “खा प्राथ. शाळांचे वेतन शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या इच्छे नुसार कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते उघडून त्या खात्यांतून वेतन करणेस परवानगी देणेची मागणी केली होती व शासनाकडे सातत्यांने प्रयत्न चालू होते .व मा . शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्यांध्यापकांच्या कार्यशाळे मध्येही यावर सविस्तर चर्चा घडवून आणली होती . या सर्व प्रयत्नास यश येऊन खाजगी शाळांतील शिक्षक – कर्मचारी
यांचे वेतन राष्ट्रीयकृत बॅकेतून करण्याचा शासनादेश झाला . त्यामुळे खाजगी प्राथमिक शाळांतील शिक्षक कर्मचार्यांच्या अनेक वर्षापासूनच्या मागणीला यश आल्याची माहिती देऊन राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी शासनांस धन्यवाद दिले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!