करवीर ता.शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी मारुती दिंडे तर व्हा.चेअरमन अनिल कंगणे
करवीर तालुका शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी मारुती दिंडे तर व्हा. चेअरमनपदी अनिल राजाराम कंगणे
कोल्हापूर/मारुती फाळके
करवीर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आर्थिक शिखरसंस्था असलेल्या करवीर तालुका शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेने पारदर्शी आणि सभासद हिताच्या कारभारावर संस्थेची भक्कम वाटचाल केली आहे. या संस्थेच्या संचालक नूतन चेअरमनपदी शिक्षक संघाचे निष्ठावंत मारुती दिंडे तर व्हा चेअरमन पदी अनिल कंगणे यांची काल झालेल्या सभेत निवड करण्यात आली. या निवडी संस्थेचे संस्थापक शामराव जाधव गुरुजी तसेच शि.द. पाटील गटाचे शिक्षक संघाचे राज्य सल्लागार तथा माजी राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
यावेळी संचालक प्रशांत पोतदार, संभाजी पाटील, दत्तात्रय एकशिंगे, संतोष कांदळकर, बाजीराव पाटील,प्रकाश निकम, धोंडीराम पाटील, विजय मालाधारी, जोत्स्ना महात्मे,नुरजहा मुलाणी, निता ठाणेकर, वर्षा सनगर, तज्ञ संचालक एन डी पाटील, भिवाजी लोखंडे, संस्थेचे सचिव अमोल लगारे,सुकाणू समितीचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते.










