साहित्याशी जोडणे हे माणूस संवेदनशील होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात- डॉ.नंदकुमार मोरे.
साहित्याशी जोडणे हे माणूस संवेदनशील होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात- डॉ.नंदकुमार मोरे.,
साहित्याच्या मेजवाणीत कोजिम प्रेरणा पुरस्कार
कोल्हापूर/मारुती फाळके
‘साहित्याशी जोडणे हे माणूस संवेदनशील होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात असते. साहित्य आणि साहित्यिक माणसांची मने घडवित असतात. वाचनामुळे जीवनाची आणि जगण्याची दृष्टी मिळते. सर्जनशीलता ही प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त ठरते.’ असे मत शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग आणि कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे (कोजिम) विविध शाळा, महाविद्यालयातील वीस शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिवाजी विद्यापीठातील भाषाभवन सभागृह येथे रविवारी, (२५ फेब्रुवारी) पुरस्कार वितरण सोहळा झाला. मानपत्र, सन्मानचिन्ह व पुस्तक भेट असे पुरस्काराचे स्वरुप आहे. याप्रसंगी डॉ. मोरे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. किरण गुरव यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
डॉ. किरण गुरव यांनी कोल्हापूरची साहित्य परंपरा याविषयी विवेचन केले. कोल्हापूरची साहित्य परंपरा ही बहुढंगी, बहुरंगी आहे. मराठी साहित्य धारणेला बळ देणारी आहे. लेखकासाठी त्याची भाषा ही सार्वभौम असते असे त्यांनी नमूद केले.
नंदकुमार मोरे म्हणाले,शिक्षकांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीत सृजनतेचा विकास करावा आजच्या विज्ञान तंत्रज्ञान व प्रसार माध्यमांच्या विळख्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील जीवनाच्या उभारणीसाठी स्वभाषेतून सृजनशिलतेचा विकास साधण्याची आवश्यकता आहे.
मराठी साहित्यातील पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोल्हापूरच्या मराठी मातीतूनच झाली. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि. स. खांडेकर, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, रणजित देसाई, आनंद यादव, राजन गवस , कृष्णा खोत आदी साहित्यिकांचे मराठी ग्रामीण साहित्याचे मोलाचे योगदान आहे. असे मत शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. किरण गुरव यांनी व्यक्त केले.
यावेळी मराठी विषयात विविध उपक्रम राबवून मराठी भाषेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणाऱ्या आणि विविध परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना गौरव पुरस्कार, प्रेरणा पुरस्कार ,व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी स्वाक्षरी स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या शिक्षकांना कोजिमच्या वतीने गौरविण्यात आले.
स्वागत अरुण कुंभार , प्रास्ताविक कोजिमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले. तर पाहुण्यांची ओळख व्ही जी सुतार यांनी केली.
कोजिमचे उपाध्यक्ष पी.डी. पाटील, नेताजी डोंगळे ,विजय सरगर ,बी.एस. कांबळे,राहूल टिपुगडे, एम.एस.पाटील, सोनल गाडेकर, सदाशिव -हाटवळ , सचिन हावळ ,अन्वर पटेल, मारुती लाड,राजेंद्र भोरे, गुलाबराव लांडगे, मारुती मुसळे,एस.डी. खतकर, संजय साबळे, रवी पाटील आदीसह पुरस्कार प्राप्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन यादव यांनी सूत्रसंचालन तर मनिषा डांगे यांनी आभार मानले. कोजिमचे उपाध्यक्ष पी. डी. पाटील, अरुण कुंभार, विजय सरगर, सोनल गाडेकर, नेताजी डोंगळे आदी उपस्थित होते.
…………………….
कोजिम गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक पुढीलप्रमाणे –
रवींद्र महापुरे उत्तूर विद्यालय, सुलोचना बागडी छत्रपती राजाराम हायस्कूल कसबा बावडा, संजय पाटील चिंचवाड हायस्कूल. कोजिम प्रेरणा पुरस्कार – रामकृष्ण गव्हाणकर गारगोटी हायस्कूल, हणमंत पाऊसकर धनंजय विद्यालय नागणवाडी, पांडूरंग गुरव दूधसाखर विद्यानिकेतन बिद्री, विठृठल पात्रे माध्यमिक विद्यालय चाफोडी, तानाजी लोखंडे करवीर प्रशाला विक्रमनगर, मीनाज पटेल विनायक हायस्कूल शहापूर, रमेश पाटील दूधगंगा माध्यमिक विद्यालय ऐनी, अशोक शिर्के माध्यमिक विद्यालय पंडेवाडी, संजय पाटील माध्यमिक विद्यालय सांगशी, विजयकुमार कांबळे लालबहाद्दूर माध्यमिक विद्यालय कवठेगुलंद, रत्नाकर सरदेसाई न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण, दौलतराव कांबळे दाबिल हायस्कूल आजरा, रुपाली मोटे साई हायस्कूल कोल्हापूर, अजित गायकवाड कळे विद्यामंदिर, रमेश वसगडे जयवंत माध्यमिक विद्यालय मजले, विलास कांबळे (श्रीमती बी. के. पाटील हायस्कूल गिरगाव), धनश्री मोहिते सेंट झेविअर्स हायस्कूल.आदर्श विद्यानिकेतन मिणचे येथील शिवाजी पाटील, माध्यमिक विद्यालय कसबा आरळे येथील सुधीर आमणगी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
फोटो ओळी-
(कोजिम पुरस्कार वितरण प्रसंगी डॉ. किरण गुरव , प्रा. डॉ. नंदकुमार मोरे , राजेंद्र पाटील , पी डी पाटील , बी एस कांबळे , विजय सरगर आदी मान्यवर)










