March 24, 2026

शिक्षक बँकेतील नोकरभरती बेकायदेशीर,३० कर्मचाऱ्यांची भरती रद्द करण्याचे उपनिंबधकांचे आदेश

0
IMG-20240309-WA0008

शिक्षक बँकेतील नोकरभरती बेकायदेशीर

३० कर्मचाऱ्यांची भरती रद्द करण्याचे उपनिंबधकांचे आदेश

कोल्हापूर/प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था असलेल्या प्राथमिक शिक्षक बँकेत गत संचालक मंडळाच्या काळात ३० कर्मचाऱ्यांची नोकरभरती केली होती.
नोकर भरतीचे निकष डावलून भरती केल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी प्राथमिक शिक्षक बँकेतील तीस कर्मचाऱ्यांची भरती रद्द करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार बँक व्यवस्थापनने संबंधित कर्मचाऱ्यांना कामावरुन कमाी करण्यात येत असल्याच्या नोटीसा लागू केल्या आहेत. या भरती विरोधात परशराम कल्लाप्पाण्णा कांबळे यांनी तक्रार केली होती.

२०१९ मध्ये बँकेत नोकर भरती झाली होती. तत्कालिन अध्यक्ष साहेब शेख यांच्या कालावधीत ही भरती झाली होती. शिक्षक बँकेतील भरती प्रकरण बँकेच्या निवडणुकीतही गाजले होते. तत्कालिन सत्ताधारी आणि विरोधी आघाडीत आरोप, प्रत्यारोप झाले. बँकेच्या निवडणुकीत सत्तांतर होऊन विरोधी आघाडी सत्तास्थानी आली. दरम्यान बँकेतील नोकर भरती प्रकरणी सहकार खात्याकडे तक्रारी झाल्या होत्या. पुणे सहकार आयुक्तांनी २८ डिसेंबर २०२३ रोजी बँकेतील नोकर भरती बेकायदेशीर असल्याचे म्हटले. मात्र त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नव्हती. यासंबंधी परशराम कांबळे यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांनी सोळा फेब्रुवारी २०२४ ला बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता.

शिक्षक बँकेमध्ये नोकर भरती करताना सरकारी नियमांचे पालन झाले नाही, पन्हाळा येथे शाखा नसताना शाखा असल्याचे दाखवून कर्मचाऱ्यांची भरती केली यासंबंधी तक्रारी झाल्या होत्या. यासंबंधी कागदपत्रांची तपासणी केली असता चुकीच्या पद्धतीने नोकर भरती झाली असून कायदेशीर कारवाई करावी असे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!