March 24, 2026

सपनाज मुलाणी यांना ज्ञानज्योती आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

0
IMG-20240311-WA0043

सपनाज मुलाणी यांना ज्ञानज्योती आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

कोल्हापूर/मारुती फाळके

कोल्हापूर जिल्हा सांस्कृतिक मंच यांच्या वतीने देण्यात येणारा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार भोसलेवाडी ता.शाहूवाडी या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सपनाज बाळासो मुलाणी(भेडसगाव)याना कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे महासचिव नामदेवराव कांबळे, उपशिक्षणाधिकारी शंकर यादव,शिक्षक नेते राजाराम वरुटे,प्रशांत निकम शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील,व्हा.चेअरमन अमर वरुटे आदी
मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.कोल्हापूर येथील ऐतिहासिक शाहू स्मारक भवन मध्ये हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील २७ उपक्रमशील शिक्षिकाना गौरविण्यात आले.

सपणाज मुलाणी या उपक्रमशील शिक्षिका असून  त्यांनी आजवर शिष्यवृत्ती, नवोदय,प्रज्ञा शोध, क्रीडा स्पर्धा ,सांस्कृतिक स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन अशा विविध स्पर्धात अनेक विद्यार्थी चमकवले आहेत.,शालेय,सहशालेय व गुणवत्ता विकासाचे अनेकविध उपक्रम राबवून त्यांनी केंद्रशाळा भेडसगाव,विद्या मंदिर येळाणे आणि सध्या कार्यरत असणाऱ्या विद्या मंदिर भोसलेवाडी या शाळा तालुका व जिल्हा स्तरावर नावारूपाला आणल्या आहे.सध्या कार्यरत असणाऱ्या भोसलेवाडी शाळेत एकही विद्यार्थी अप्रगत नाही हे त्यांच्या कार्याचे विशेषगुण आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेऊन सांस्कृतिक मंच कोल्हापूर ने त्यांची गुणवंत शिक्षिका पुरस्कारासाठी निवड केली.

 

आजवर त्यांचे असंख्य विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत प्राविण्य प्राप्त झाले आहेत. बहुजन समाजातील,गोरगरीब घरातील विद्यार्थी गुणवत्तापूर्ण झाले पाहिजेत हा त्यांचा ध्यास आहे.यावर्षी झालेल्या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत भोसलेवाडी शाळेची त्यांची विद्यार्थिनी प्रचिती प्रकाश भोसले या विद्यार्थिनीने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. अवघा १९ पट असणाऱ्या भोसलेवाडी शाळेने या सालातील सांस्कृतिक स्पर्धेची शाहूवाडी तालुक्याची जनरल चॅम्पियनशिप मिळवली आहे. भोसलेवाडी शाळेत ४ वर्षात ४ लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव करून शाळेचे रुपडे पालटले आहे. या कार्यात त्यांचे सहकारी दिलीप भोसले,प्रिया खातू, भोसलेवाडी शाळा व्यवस्थापन समिती,पालक,विद्यार्थी यांचा मोलाचा वाटा आहे. या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

यावेळी खाजगी शिक्षक महासंघाचे राज्य सचिव
राजेंद्र कोरे,  कौशल्य विकास विभाग सांगलीचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम,हातकणंगले विस्ताराधिकारी जहांगीर मुलाणी,उपशिक्षणाधिकारी शंकर यादव,महासचिव नामदेवराव कांबळे, राजाराम वरुटे,पांडुरंग कांबळे, पी डी सरदेसाई, शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील, व्हा.चेअरमन अमर वरुटे,संचालक बाळासाहेब निंबाळकर, प्रशांत निकम,जुनी पेंशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे,शाहूवाडी कास्ट्राईब चे शाहूवाडी अध्यक्ष सदाभाऊ कांबळे,हेमंत भालेकर,मारुती फाळके, शिक्षक भारती चे शाहूवाडी तालुका अध्यक्ष नानासो कांबळे,संजय म्हावळे, भारती पाटील सांस्कृतिक मंच चे तुकाराम कांबळे, पी डी सरदेसाई उपस्थित होते.

(फोटो ओळी-उपक्रमशील शिक्षिका सपनाज मुलाणी यांना सांस्कृतिक मंचच्या वतीने ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान करताना उपशिक्षणाधिकारी शंकर यादव,महासचिव नामदेव कांबळे,राजाराम वरुटे सहाय्यक आयुक्त जमीर करीम, राजेंद्र कोरे,तुकाराम संघवी, पि.डी. सरदेसाई,चेअरमन राजेंद्र पाटील, बाळासाहेब निंबाळकर, अमर वरुटे आदी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!