March 18, 2026

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्य पदी अमर पाटील

0
IMG-20240317-WA0075

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्य पदी अमर जयवंत पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्य पदी बांबवडे ता.शाहूवाडी येथील अमर जयवंत पाटील यांची निवड झाली.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून ही समिती गठित करण्यात आलेली आहे. जिल्हा ग्राहक परिषदेवर बारा सदस्य निवडले असून शाहूवाडी तालुक्यातील अमर पाटील यांना संधी मिळाली आहे. त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीमध्ये तालुका व जिल्हा पातळीवर भरीव काम केले असून त्या कामाची त्यांना पोचपावती मिळाली आहे.

या निवडीसाठी त्यांना ग्राहक पंचायत प्रांत संघटन मंत्री प्रसाद बुरांडे, प्रांत सचिव संदिप जंगम, प्रांत कोषाध्यक्ष एन. ए. कुलकर्णी , जिल्हाध्यक्षा सुप्रिया दळवी, संघटक जगन्नाथ जोशी, डॉ.संजय मगदूम, नंदकुमार जामदार, रामकृष्ण सातपुते उत्तम गुरव, अशोक परिट यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!