ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम
ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर विविध वैचारिक कार्यक्रम
कोल्हापूर/मारुती फाळके
जेष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे , अशी माहिती अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य जी. पी. माळी व सचिव शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी ११ एप्रिल, २०२४ रोजी वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश केला आहे. त्यांचे सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचा विचार करता त्यांचे अमृत महोत्सवी वर्ष वैचारिक मंथन आणि विविध समाजोपयोगी उपक्रमाने साजरे करण्यात येत आहे.
नियोजनाची प्रथम बैठक 24 मे, 2024 रोजी अक्षर दालन, कोल्हापूर येथे झाली. या बैठकीस प्राचार्य डॉ. जी. पी. माळी, विश्वास सुतार, प्राचार्य डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, प्रा. टी. के. सरगर, प्रा. सी. एम. गायकवाड, संजय कळके, सागर बगाडे, प्रा. जॉर्ज क्रुझ, अमेय जोशी, विजय एकशिंगे, दीपक जगदाळे, अमेय जोशी, भाग्यश्री कासोटे आदी उपस्थित होते.
अमृत महोत्सव समितीमार्फत वर्षभरात चार कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. रविवार २३ जून रोजी डॉ. विवेक सावंत (चीफ मेंटर, एमकेसीएल फाउंडेशन) यांचे
कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षितिजे व मानव
संभाव्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. विनोदकुमार लोहिया अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात सायंकाळी चार वाजता व्याख्यान होणार आहे.
रविवारी २२ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक प्रा. सुरेश द्वादशीवार यांचे चार्वाक ते पानसरे या विषयावर व्याख्यान होणार आहे. डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी असतील. यावेळी डॉ. प्रमोद मुनघाटे यांची उपस्थिती राहणार आहेत.राम गणेश गडकरी सभागृहात सायंकाळी चार वाजता व्याख्यान होणार आहे.
शनिवारी २८ डिसेंबर रोजी कोल्हापूरातील शाळांमध्ये ‘लेखक आपल्या भेटीला’ हा उपक्रम क्रिएटिव्ह टीचर्स फोरमने आयोजित केली आहे. त्यादिवशी दुपारी १२ ते ४ या कालावधीत न्यू कॉलेज येथे शिक्षण परिषद होणार आहे.
पुढील वर्षी ११ एप्रिल २०२५ रोजी निमंत्रितांच्या उपस्थितीत डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळा होणार आहे. यावेळी ग्रंथ प्रकाशन व गौरव समारंभ असा संयुक्त कार्यक्रम होणार आहे.










