March 24, 2026

प्रलंबित मागण्यासाठी पेन्शन संघटनेचे जि.प.समोर धरणे आंदोलन.

0
IMG-20240614-WA0056(1)

प्रलंबित मागण्यासाठी पेन्शन संघटनेचे जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन..!
३० जून पर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आश्वासन

कोल्हापूर/प्रतिनिधी

Dcps शिक्षक एकजुटीचा विजय असो,हमारी मांगे पूरी करो,हम सब एक है,आमच्या मागण्या मान्य करा, सेवेतले हक्काचा लाभ देण्यासाठी टाळाटाळ का?न्याय्य मागण्याची दखल घ्या!,इनक्लाब जिंदाबाद!! ,इस शासन पर हल्लाबोल अशा घोषणानी परिसर दणाणून सोडत  प्रलंबित मागण्यासाठी जुनी पेंशन संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद प्रवेशद्वाराजवळ एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

बारा वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावास मंजुरी मिळण्यास होत असलेला विलंब आणि डीसीपीएस/ एनपीएस योजनेतील अनेक प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शिक्षक कर्मचारी एकवटत जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

सदरचे धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

मंगेश धनवडे म्हणाले, प्राथमिक शिक्षकांना एकाच पदावर एकाच वेतनावर बारा वर्षे पूर्ण झाल्यास वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ दिला जातो. या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून डिसेंबर २०२२ पर्यंत बारा वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लाभ देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रस्तावांची मागणी केली होती. पण जवळजवळ दोन वर्ष होत आलेली आहेत तरीही सदर वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही. प्रस्तावांमध्ये प्रशासनाकडून वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी काढण्यात येत आहेत. एकाच वेळी त्रुटी न काढता एक त्रुटी पूर्ण झाल्यानंतर दुसरी त्रुटी निदर्शनास आणून दिली जात आहे. या सर्व एकंदरीत प्रक्रियेस प्रचंड विलंब लागत असून पात्र शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत आहे. या अनुषंगाने या अगोदर २ वर्षे जिल्हा प्रशासन शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. वारंवार भेटी घेण्यात आल्या आहेत. पण प्रस्ताव मंजुरी होण्यास विलंब लागत आहे. या बाबीमुळे कर्मचाऱ्यांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला आहे. म्हणून हे धरणे आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) नावाची पेन्शन योजना चालू करण्यात आली होती. सदर योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये (एनपीएस) समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे डीसीपीएस योजनेतील कर्मचाऱ्यांच्या रकमा एनपीएस मध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया चालू आहे. पण या अनुषंगाने येत असलेल्या अडचणी, आंतरजिल्हा बदलीने गेलेले आणि आलेल्या शिक्षकांच्या रकमाबाबत निर्माण झालेल्या अडचणी, एनपीएस अकाउंट मध्ये प्रत्येक महिन्याचे पैसे वर्ग होण्यासाठी होत असलेला विलंब, इतर खात्यातून शिक्षक खात्यामध्ये बदली करून आलेले कर्मचाऱ्यांची एनपीएस अकाउंट ट्रान्सफर करणे बाबत, जाहिरात व अधिसूचना 2005 पूर्वीची असलेल्या कर्मचाऱ्यांचे विकल्प प्रस्ताव, एनपीएस अकाउंट मध्ये चुकलेले माहिती दुरुस्त करणे होत असलेली दिरंगाई या सर्व गोष्टींवर समाधानकारक कार्यवाही व्हावी.नियोजित वेळापत्रकानुसार जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया पार पाडण्यात यावी.१ जुलै पूर्वी नवीन शिक्षकांना पदस्थापना देण्यात यावी. अशी शिक्षक कर्मचारी बांधवांची मागणी आहे. असेही धनवडे म्हणाले,

आंदोलनात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने झाले आहेत,लवकरात लवकर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर लोकशाही मार्गाने भविष्यात आंदोलन तीव्र केले जाईल असेही ते म्हणाले.

यावेळी संघटनेचे विजय रामाणे,संतोष गायकवाड,अमर वरुटे, मारुती फाळके, निलेश कारंडे, बालाजी पांढरे,आरती पोवार,रवी पाटील,अर्जुन पाटील,तानाजी घरपणकर,गजानन कांबळे यांची भाषणे झाली.

यावेळी संघटनेचे राज्यसह कोषाध्यक्ष श्रीनाथराव पाटील, शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन अमर वरुटे,मारुती फाळके जिल्हा मार्गदर्शक संजय भोसले, बी एल कांबळे, राहुल कांबळे, जिल्हा सरचिटणीस विजय रामाने, जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पांढरे, जिल्हा कोषाध्यक्ष निलेश कारंडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड, विश्वनाथ बोराटे, गजानन कुंभार, संजय पाटील, अमोल गायकवाड, जिल्हा प्रवक्ते प्रमोद पाटील, जिल्हा आयटी विभाग प्रमुख सुनील पाटील, जिल्हा महिलाध्यक्षा आरती पोवार, जिल्हा महिला सरचिटणीस संगीता कडूकर,चेतन शिंदे,प्रकाश भोसले, विठ्ठल पाटील,दिलीप वाळवेकर, आनंद पाटील,दीपक गायकवाड, संतोष जुगळे, संदीप पाटील,सागर उबाळे,सुनील सुतार, आनंदा बनकर,मिलिंद कांबळे, सचिन सुतार,सदानंद शिंदे,लक्ष्मण घावटे, दिगंबर मोहिते,प्रशांत देवरुखकर,प्रशांत राणे,बबन शेटे,विजय कांबळे, प्रदीप गायकवाड, विनोद पवार,संजय रोगे,दीपक गायकवाड, देवाप्पा पालके,बाबुराव निकम,संजय भोसले,वैभव, मारुती पोवार, सागर पाटील,रवी कुपले, आनंद कांबळे, सत्यवान सोने,बाबुराव कांबळे, मारुती पाटील,प्रदीप गायकवाड डाकरे,अमोल कोळी,सुरेखा पवार, अनिता शेटे,कोमल राऊत, स्नेहा माळी, संयोगीता महाजन, संगीता दिवटे, योगिता गायकवाड, धनश्री शिंदे, जयश्री मामिलवाड, कविता पुरी,स्मिता गायकवाड, सुरेखा चौगुले,  विजय कांबळेअनिल खांडेकर, राणेश्वर थोरबोले यांच्यासह विविध तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी, महिला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

३० जूनपर्यंत मागण्या मान्य करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आश्वासन ….
आज झालेल्या धरणे आंदोलनात संघटनेच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या चर्चेत मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन व शिक्षणाधिकारी मीना शेंडकर मॅडम यांनी ३० जून पर्यंत वरिष्ठ वेतन श्रेणी व एनपीएस रक्कम वर्ग करण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.

आंदोलनासाठी शिक्षक समिती, शिक्षक संघ(थोरात गट), मागासवर्गीय शिक्षक संघटना, शिक्षक भारती या संघटनांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला. शिक्षक बँकेच्या वतीने आंदोलन कर्त्यांना पाण्याच्या बाटल्या पुरवठा करून सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!