समता सायकल रॅलीद्वारे शाहूंना मानवंदना ‘फिटनेस क्लब’ चा अनोखा उपक्रम
समता सायकल रॅलीद्वारे शाहूंना मानवंदना
फिटनेस क्लब चा अनोखा उपक्रम
कोल्हापूर/मारुती फाळके
राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त फिटनेस क्लब च्या वतीने समता सायकल रॅलीद्वारे १५० किलोमीटर अंतराची परिक्रमा पूर्ण करून राजर्षी शाहूंना मानवंदना देण्यात आली. या अनोख्या उपक्रमात कोल्हापूर ते राधानगरी धरण व महाराजांच्या ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यात आली. यानिमित्त झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, प्रदूषणमुक्त भारत होण्यासाठी सायकल चालवा असा संदेश देण्यात आला.
या उपक्रमात राणेश्वर थोरबोले (मुख्याध्यापक विद्यामंदिर, हणमंतवाडी) राम मोहन कारंडे (अध्यक्ष फिटनेस क्लब ),भीमराव सुतार दीपक सावेकर ,सुनील ऐतवडे ,जयदीप पाटील समर कारंडे आदी सहभागी होते.
———————————-
सामाजिक भान जपुया
ज्या महापुरुषाचे कार्य कर्तृत्व आकाशाला गवसणी घालणारे आहे .अशा दृष्ट्या लोकराजाच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सामाजिक भान जपावे. या हेतूने ही एक वेगळी आदरांजली..
-राणेश्वर थोरबोले, मुख्याध्यापक विद्यामंदिर हणमंतवाडी.
राज्य सायकलिंग पंच, सायकलींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र.
फोटो ओळी-
समता सायकल रॅलीत सहभागी
फिटनेस क्लबचे सदस्य राणेश्वर थोरबोले, सुनील ऐतवडे, समर कारंडे, जयदीप पाटील, दीपक सावेकर , राममोहन कारंडे, भीमराव सुतार आदी.










