March 24, 2026

शिक्षक समितीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी संगीता अस्वले

0
IMG-20240904-WA0068

शिक्षक समिती महिला जिल्हाध्यक्षपदी संगीता प्रकाश अस्वले,सरचिटणीसपदी शुभांगी माळी.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची नूतन महिला कार्यकारिणी स्थापन

कोल्हापूर/मारुती फाळके

      महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कोल्हापूर च्या संगीता प्रकाश अस्वले यांची महिला जिल्हाध्यक्षापदी तर शुभांगी माळी यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. कोल्हापूर येथील शिक्षक बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नूतन महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.

या निवडीसाठी जिल्हाभरातून महिला शिक्षिका उपस्थित होत्या. अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या जास्त होती. जिल्ह्यातील शिक्षक समितीच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन सौ संगीता प्रकाश अस्वले यांचे एकमताने अध्यक्षांना निवड करण्यात आली.निवडी पूर्वी नेतृत्व निवडीसाठी प्रदीर्घ वेळ चर्चा झाली. जिल्ह्यातून आलेल्या महिलांनी आपली मनोगते व्यक्त केली. स्वतः त्या पदाचे दावेदार का हे सुद्धा नमूद केले.
शिक्षक समितीची आक्रमक कार्यपद्धती अजेंड्यावर ठेवून नूतन कार्यकारीणी ने भावना व्यक्त केल्या.

यावेळी  जिल्हाध्यक्ष प्रमोद तौदकर सर यांच्या अध्यक्षतेखाली  निवडी पार पडल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष तौदकर म्हणाले, ” शिक्षकांचे प्रश्न अनेक आहेत, त्यासाठी शिक्षक समिती दिवस काम करत आहे. महिला भगिनींचे सुद्धा खूप मोठे प्रश्न आहेत. या निवडीने महिलाची भक्कम साथ मिळेल. शिक्षक प्रश्न तात्काळ मार्गी लागतील. ”

नूतन कार्यकारिणी अशी:
१)संगीता प्रकाश अस्वले – जिल्हाध्यक्षा
२)शुभांगी माळी – सरचिटणीस
३)शिल्पा तुर्केवाडकर -कार्याध्यक्ष
४)अनुष्का गोवेकर – कोषाध्यक्ष
५) पूजा पंडित पाटील -जिल्हा नेत्या
६)रेखा गायकवाड -जिल्हा उपाध्यक्ष
७)शुभांगी पाटील -जिल्हा उपाध्यक्ष

यावेळी शिक्षक नेते जोतराम, पाटील यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. पुणे विभाग प्रमुख अर्जुन पाटील शिक्षक बँक संचालक राजेंद्र पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकामधून श्री कमळकर म्हणाले, ” जिल्हा महिला आघाडी ही गरज आहे. अध्यक्ष प्रमोद तौदकर यांच्या नेतृत्वाखाली आपण निर्भीड पणे काम करावे. जिल्हा शाखा सदैव सोबत असेल. “
यावेळी शिक्षक बँक संचालक बाबुराव परीट,रामदास झेंडे, शिवाजी बोलके, महिला राज्यध्यक्षा वर्षा केनवडे मावळात्या जिल्हाध्यक्षा दीपाली भोईटे, शिक्षक नेते सुनील शिंदे,राज्य प्रसिद्धी प्रमुख हरिदास वर्णे,कार्याध्यक्ष गणपतराव मांडवकर, कोषध्यक्ष सुनील कुंभार, जि प कर्मचारी सोसायटी चे संचालक बाजीराव पाटील,जि प कर्मचारी सोसायटीचे मा. चेअरमन राजीव परीट,सचिन कोल्हापूरे, बाळकृष्ण पाटील, अभिजित काटकर, अरविंद पाटील,राजू नाईक, तुकाराम मातले, विनायक चौगले,करवीर पतसंस्थेचे संचालक माजी करवीर अध्यक्ष डी डी पाटील, यशवंत चौगले, राजू तौदकर, शशिकांत धुत्रे, दीपक पाटील, बाबा धुमाळ, सुकुमार मानकर, संजय जितकर,सर्व तालुक्याचे अध्यक्ष,सरचिटणीस, व शिक्षक समिती चे कार्यकर्ते खासकरून महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!