March 24, 2026

गौतम वर्धन यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासणारा! विद्या मंदिर मौजे वडगाव शाळेला ग्रंथभेट!

0
IMG-20240911-WA0081

गौतम वर्धन यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासणारा!

विद्या मंदिर मौजे वडगाव शाळेला ग्रंथभेट

विजय कांबळे यांच्या अनोख्या शुभेच्छा!

कोल्हापूर/मारुती फाळके

वाढदिवस म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम,जल्लोष, मौज मजा असते,पण या सर्व सुखचैन-मिजासीच्या गोष्टीना फाटा देत शिव- फुले-शाहू- आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांचा संस्कार देणारी पुस्तके शाळेला भेट देत कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व शिक्षक बँकेचे संचालक गौतम वर्धन यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.हातकणंगले चे कार्यकर्ते,संघटनेचे जिल्हा संघटक विजय कांबळे यांच्या सामाजिक जाणिवेच्या संकल्पनेततुन हा कार्यक्रम मौजे वडगाव या जिल्हा परिषदेच्या आदर्श प्राथमिक शाळेत संपन्न झाला.

गौतम वर्धन हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची जोपासना करणारे व्यक्तिमत्व. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळातील असंख्य शिक्षकांची जात पडताळणी करण्याचे शिवधनुष्य या अवलियाने पेलले होते.पदरमोड करत अनेक शिक्षक बांधवांची जात वैधता मिळवून देण्यासाठी या शिक्षक नेतृत्वाने अथक परिश्रम घेतले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश शाळांना संविधान वाटप करून भारताच्या संविधानाबद्दल जाणीव जागृती केली आहे.
महात्मा फुले चा स्मृतिदिन २८ नोव्हेंबर हाच खरा शिक्षक दिन असल्याचा विचार प्रसार करत जिल्ह्यात प्रबोधनात्मक पायंडा पाडला.महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारचे प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. कोल्हापूर जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून गेली दोन वर्ष ते समर्थपणे काम पाहत असून शिक्षकांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा- राज्य स्तरावर नेहमीच क्रियाशील असतात.शाळा,शिक्षक, समाज,विद्यार्थी, पालक यांचा प्रशासनासमवेत संवाद घडवणे, कर्मचाऱ्याच्या प्रश्नांचा निपटारा करणे याबाबतीत त्यांचा नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन राहिला आहे. शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या पावत्या प्रत्यक्ष त्यांच्या हातात पोहोचवण्यात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्य जिल्ह्याला सर्वश्रुत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यात ते नेहमीच अग्रभागी राहिले आहेत.

यावेळी बोलताना विजय कांबळे म्हणाले,संघटनेने नेहमीच शिक्षक हिताचा विचार करून काम केलेले आहे, गौतम वर्धन सरांचे काम जिल्ह्याला मार्गदर्शक आहे.,संघटनेच्या पाठीशी कोणत्याही प्रकारची आर्थिक ताकद नसताना जिल्ह्यातील नेतृत्व व कार्यकर्ते पदरमोड शिक्षकांची सर्वच प्रकारची कामे करत असतात,याची कधीच कुठे प्रसिद्धी केली जात नाही. सर्वांनी इथून पुढच्या काळात संघटनेच्या विचार कार्याबरोबर राहण्याचे त्यांनी आवाहन केले.

यावेळी बोलताना संघटनेचे मार्गदर्शक आकाराम कांबळे म्हणाले, विचार आणि चळवळीची दिशा कुठेतरी आज भरकटली जात आहे का अशा आजच्या वातावरणामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेच्या प्रत्येक अनुयायाने संघटनेत- समाजात सक्रिय राहणे गरजेचे आहे.ज्ञान हे माणसाला महान बनवत असते. वाचन आणि व्यासंगाने माणसाचे व्यक्तिमत्व बहरत असते., आणि हाच विचार जोपासत विजय कांबळे यांनी गौतम वर्धन यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे.

यावेळी बोलताना मारुती फाळके म्हणाले, गौतम वर्धन हे व्यक्तिमत्त्व सामाजिक बांधिलकीचे विधायक विचार जोपासण्यासाठी नेहमी कटिबद्ध असतात. शाळा शिक्षक प्रशासन यांच्याकडे नेहमी शिक्षकांच्या समस्येचा निपटारा करण्यासाठी कार्यरत असतात. गौतम वर्धन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आजरा तालुक्याचे अध्यक्ष आणि सध्या हातकणंगले तालुक्यात बदलीने आलेले, संघटनेचे आघाडीचे शिलेदार विजय कांबळे यांनी वर्धन यांचा वाढदिवस ग्रंथ भेट देत साजरा करण्याचा विचार समाजाला दिशा देणारा आहे.

यावेळी मौजे वडगाव शाळेच्या वतीने वर्धन यांना संविधानाची प्रत शाल, बुके देऊन त्यांचा वाढदिवसानिमित्त सर्व स्टाफच्या वतीने सत्कार करण्यात आला. व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या ऋणात.!-

संघटनेचा बुलंद आवाज जिल्हा सरचिटणीस संजय कुर्डुकर सर , कोषाध्यक्ष पी. डी. सरदेसाई सर , संघटक ए. एल.कांबळे सर, कार्याध्यक्ष तुकाराम संघवी , सुखदेव कदम , अशोक कांबळे ज्येष्ठ मार्गदर्शक घस्ते गुरुजी , यशवंत सरदेसाई ,आकाराम कांबळे, वसंत देसाई गुरुजी, बाबासो कांबळे गुरुजी व सर्व तालुका अध्यक्ष या सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शना खाली संघटनेचे कार्य निष्ठेने व जोमाने करत आहे. या सर्वांच्या अथक परिश्रमातूनच ते जिल्हा शिखर बँकेत पोहोचलो आहे,हे कदापि विसरून चालणार नाही.इथून पुढे ही सदैव कार्यरत राहून शिक्षकांच्या प्रश्नासाठी सदैव प्रामाणिकपणे कार्यरत राहीन.
——––गौतम वर्धन

जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब शिक्षक संघटना
संचालक-शिक्षक बँक कोल्हापूर.

कार्यक्रमास संघटनेचे मार्गदर्शक सुरेश जाधव, संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे, जिल्हा मार्गदर्शक आकाराम कांबळे, बाबासाहेब कांबळे, मारुती फाळके आदीसह मौजे वडगाव प्राथमिक शाळेतील शिक्षक- शिक्षिका उपस्थित होते.
प्रास्ताविक कुंभार,स्वागत मुल्ला तर आभार मुख्याध्यापक बाळासो कोठावळे यांनी मानले.

चौकट-

ज्ञान दिल्याने……… !
गतसालात आणि याही वर्षी “मुख्यमंत्री माझी शाळा अभियाना”मध्ये तालुक्यात सर्वप्रथम क्रमांका ची प्रबळ दावेदार असलेली मौजे वडगाव या प्राथमिक शाळेला वर्धन यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रबोधनात्मक विचारांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या तब्बल शंभर च्या वर ग्रंथ शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कोठावळे व शिक्षक वृदांकडे सुपूर्द करण्यात आले.या विधायक कृतीमुळे शाळेच्या ग्रंथालयात तब्बल १०० ग्रंथकृतीची भर पडली.ह्यामुळे शाळेचे ग्रंथालय समृद्ध झाले.ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते या संस्काराचाच हा विचार समाजाला प्रबोधनाच्या वाटेवर घेऊन जाणारा आहे.

फोटो ओळी-
गौतम वर्धन यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे वडगाव या जिल्हा परिषदेच्या आदर्श प्राथमिक शाळेस पुस्तके भेट देताना गौतम वर्धन, विजय कांबळे, आकाराम कांबळे, मारुती फाळके, बाबासाहेब कांबळे, सुरेश जाधव, दिलीप कांबळे आदी. सोबत शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कोठावळे,व सर्व स्टाफ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!