March 24, 2026

करवीर ता.प्राथ.शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी यशवंत चौगुले,व्हा.चेअरमनपदी सचिन पावसकर

0
IMG-20240914-WA0046

करवीर ता.प्राथ.शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी यशवंत चौगले,व्हा.चेअरमनपदी सचिन पावसकर

कोल्हापूर/मारुती फाळके

करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिक्षक समितीचे निष्ठावंत यशवंत गणपती चौगले(निगवे दुमाला) तर व्हा चेअरमनपदी सचिन मारुती पावसकर(निगवे खालसा)यांची एकमताने निवड करण्यात आली.या निवडी शिक्षक समितीचे नेते कृष्णात कारंडे व शिक्षक बँकेचे संचालक सुरेश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सौ .आडसूर होत्या.

यावेळी शिक्षक समितीचे जिल्हानेते व पतसंस्थेचे मार्गदर्शक कृष्णात कारंडे बोलताना म्हणाले,करवीर तालुका शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेमुळे शिक्षकांच्या जीवनात आर्थीक स्थैर्य होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मोलाचा हातभार लागला आहे.सर्वाधिक आर्थिक लाभ देणारी,शिक्षक हिताचे निर्णय घेणारी कोल्हापूर जिल्ह्यातील सक्षम शिक्षक सहकार पतसंस्था म्हणून या संस्थेने जिल्ह्यात लौकिक मिळवला आहे.

शिक्षक बँकेचे संचालक सुरेश कोळी आपल्या मनोगतात म्हणाले,अवघ्या १% मार्जिन मध्ये सर्वाधिक लाभ देणारी ही एकमेव पतसंस्था असून भविष्यात सभासदहिताचे निर्णय घेऊन संस्थेच्या आर्थिक वृद्धीसाठी सभासदांनी नियमित हफ्ते भरणा,ठेवीसाठी सहकार्य करावे.
यावेळी शिक्षक बँकेच्या संचालिका वर्षा केनवडे यांच्या हस्ते मावळत्या चेअरमन दिपाली भोईटे, व्हा.चेअरमन श्री शशिकांत धुत्रे यांचा सत्कार करण्यात आला.

नूतन चेअरमन,व्हा.चेअरमन यांचे मार्गदर्शक,शिक्षक सभासदांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन रामदास झेंडे ,समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर,शिक्षक बँकेच्या संचालिका वर्षा केनवडे ,सतीश बरगे,शिक्षक बँक संचालक गौतम वर्धन, शरद केनवडे,संजय कुर्डुकर,संस्थेचे संचालक सुकुमार मानकर , धनाजी सासणे , धनाजी पाटील , बाळासो कांबळे , राजेंद्र तोदकर, प्रताप पाटील, दीपक पाटील, गीता कोळी , अजित खाडे, संगीता अलगौंडर तसेच सल्लागार व सुकाण समितीचे मार्गदर्शक शब्बीर आवटी, दिलीप खाडे , शिवाजी लवटे, शामराव कुंभार , मधुकर जाधव, सूर्यकांत पाटील, पंडित पाटील , करवीर सरचिटणीस बाबा धुमाळ, दिलीप पाटील,विवेक जनवाडे, पंडित पाटील, आर.एस.कांबळे,प्रवीण जाधव, संतोष कांदळकर,दीपक कांबळे,सूर्यकांत पाटील, विवेक जनवाडे, दत्तात्रय पाटील, शब्बीर आवटी, मारुती वातकर, शामराव कुंभार, ए.के.पाटील, दिलीप पाटील, शहाजी शिंदे,दत्ता शिंदे,
बाबुराव निकम, आनंदा बनकर ,सचिन सुतार यासह अनेक शिक्षक बांधव उपस्थित होते.
सभेचे स्वागत संचालक सुकुमार मानकर सूत्रसंचालन संतोष गायकवाड
तर आभार धनाजी पाटील यांनी मानले.कार्यक्रमास शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट-
वसुलीसाठी प्रशासनाची मदत!

शिक्षण आयुक्तांच्या यांच्या आदेशानुसार व शिक्षणाधिकारी कोल्हापूर यांच्या तात्काळ अंमलबजावणीनुसार पगार तारण कर्जे असल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातून हप्ते कपातीस प्रशासनाने चांगले सहकार्य केल्यामुळे बँक व पतसंस्थाची कर्ज वसुली या महिन्यात मोठ्या प्रमाणात झाली असून शिक्षण खात्याच्या या निर्णयामुळे शिक्षक सहकार संस्थेची भविष्यात आर्थिक वृद्धी होण्यास मोठे पाठबळ मिळाल्याचे शिक्षक नेते कृष्णात कारंडे, शिक्षक बँकेचे संचालक सुरेश कोळी व वर्षा केनवडे यांनी सांगितले. त्याबद्दल शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, करवीर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील व प्रशासनाचे आभार मानले.

फोटो ओळी-
नूतन चेअरमन, व्हा.चेअरमन यांचा सत्कार करताना शिक्षक नेते कृष्णात कारंडे,संचालक सुरेश कोळी,वर्षा केनवडे,शरद केनवडे,सोबत संस्थेचे संचालक सुकुमार मानकर,पंडित पाटील,अजित खाडे, शशिकांत धुत्रे, धनाजीं पाटील,प्रताप पाटील,राजू तौंदकर,
धनाजी सासणे व इतर संचालक मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!