March 24, 2026

लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर सिटी तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

0
IMG-20240917-WA0009

लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर सिटी तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे यांचा विशेष सन्मान

कोल्हापूर/मारुती फाळके

लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर सिटी च्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून हॉटेल नैवेद्यम, रुईकर कॉलनी येथे दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आपल्या कोल्हापूरचे सुपुत्र सागर बगाडे  यांचा क्लबचे अध्यक्ष सूर्यकांत लोले यांचे हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच कृपाल यादव (शांतिनिकेतन ,कोल्हापूर), रामचंद्र निमणकर (तात्यासाहेब मुसळे ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी), दत्तात्रय शिंदे (विद्यामंदिर, परिते), अनिल अहिरे (स. म. लोहिया हायस्कूल), विनायक सुतार( सृजन विद्या मंदिर , मुक्त सैनिक वसाहत) या गुणवंत शिक्षकांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन क्लबच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी सागर बगाडे यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर तसेच मान. पंतप्रधान यांचे सोबतच्या मुलाखती बद्दलचे आपले अनुभव कथन केले व लायन्स क्लबच्या उपक्रमांचे कौतुक करून आभार मानले.
त्याचप्रमाणे इतर सर्व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना हा लायन्स क्लब चा पुरस्कार आमच्यासाठी पुढील आयुष्यात प्रेरणादायी राहील असे उद्गार काढले.

यावेळी अभियंता दिनाच्या  पूर्वसंध्येला क्लब मधील सेवानिवृत्त अभियंते यांचा क्लबचे ज्येष्ठ सदस्य यांचे मोहनलाल चांडक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यानंतर ला. संध्या पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले .याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष सूर्यकांत लोले, सेक्रेटरी संजय कुंभार, ट्रेझरर डॉक्टर भानुदास कोळसकर, जेष्ठ लायन सदस्य मोहनलाल चांडक, दीपकभाई शहा,अरुण संघवी,जयंत कुलकर्णी, नलिनी पारेख, पुष्पा चांडक, शीला शहा, महेश नोतानी, रेणुका नोतानी, डॉ.अश्विनी कोळसकर, दादासाहेब पाटील, संध्या पाटील, प्रकाश बासरानी, विद्यासागर पाटील, वसंतराव नाडे तसेच आदर्श शिक्षकांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!