May 14, 2026

११ मे ला तबलाविभूषण उ.हाजी बाबासाहेब मिरजकर स्मृती समारोह- अतुल ताडे

0
IMG-20260509-WA0038

११ मे ला तबलाविभूषण उ. हाजी बाबासाहेब मिरजकर स्मृती समारोह- अतुल ताडे

कोल्हापूर/प्रतिनिधी

कोल्हापूरचे प्रसिद्ध तबला वादक तबला विभूषण उ. हाजी बाबासाहेब मिरजकर यांच्या स्मृतीनिमित्त त्यांचे गंडाबंध शिष्य कोल्हापूरचे सुप्रसिद्ध तबला वादक अतुल ताडे यांच्या तबला गुरुकुलातर्फे उद्या देवल क्लब येथे सांयकाळी ५:३० वा स्मृती समारोहाचे आयोजन करण्यात आला असल्याची माहिती प्रसिध्द तबलावादक अतुल ताडे व प्रसिद्ध गायिका सीमा ताडे यांनी दिली.

दरवर्षी या संगीत समारोहाचे आयोजन केले जाते.सोमवार दि. ११ मे २०२६ रोजी संध्या.५.३० वा. गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, कोल्हापूर येथे हा स्मृती समारोह साजरा होणार आहे.

या कार्यक्रमांमध्ये अतुल ताडे यांच्या शिष्यांचे सोलो व एकत्रित तबलावादन, त्यानंतर श्रीमती सीमा अशोक ताडे यांच गायन व मुंबईचे सुप्रसिद्ध सतार वादक डॉक्टर स्वीकार कट्टी यांचे सतार वादन होणार असुन त्यांना तबलासाथ कोल्हापूर चे प्रसिद्ध तबलावादक अतुल ताडे यांची असणार आहे. विनामूल्य असणाऱ्या या कार्यक्रमास रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा व या कार्यक्रमाचा आनंद लुटावा असे आवाहन गुरुकुलातर्फे करण्यात आले आहे.

(फोटो-प्रसिद्ध तबलावादक तबला विभूषण उ. हाजी बाबासाहेब मिरजकर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!