May 14, 2026

शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी एस.व्ही.पाटील तर व्हा.चेअरमन गजानन कांबळे

0
IMG-20260511-WA0002(1)

शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी एस. व्ही. पाटील तर व्हा. चेअरमन गजानन सखाराम कांबळे

कोल्हापूर/मारुती फाळके

कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था असलेल्या दि.प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमनपदी साताप्पा विष्णू पाटील (एस. व्ही. पाटील) तर व्हा.चेअरमनपदी गजानन सखाराम कांबळे यांची निवड करण्यात आली. सहायक निबंधक चंद्रकांत इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी, दहा मे २०२६ रोजी संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड झाली. या निवडी बिनविरोध झाल्या. नूतन चेअरमन एस व्ही पाटील शिक्षक संघ थोरात गटाचे राज्य संपर्कप्रमुख हे करवीर तालुक्यातील आहेत. तर गजानन कांबळे हे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष गगनबावडा तालुक्यातील आहेत.

चेअरमनपदासाठी पाटील यांचे नाव संचालक राजेंद्रकुमार लहू पाटील यांनी सुचविले. संचालक गौतम तुकाराम वर्धन यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनपदासाठी कांबळे यांचे नाव संचालक नंदकुमार तुकाराम वाईंगडे यांनी सुचविले. त्यास संचालक अर्जुन दिनकर पाटील यांनी अनुमोदन दिले. सत्काराला उत्तर देताना नूतन चेअरमन पाटील यांनी,

बँकेच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील-एस व्ही पाटील

बँकेचे संचालक व सुकाणू समितीचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले. या संधीचा मी बँकेच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीन. अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये बँकेचा कारभार पारदर्शी होण्यासाठी आणि बँकेचा व्यवसाय व कर्जामध्ये वाढ व कर्ज व्याज दर कमी करण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. वचननाम्याच्या पूर्ततेसाठी सकारात्मक उर्जा घेऊन सभासदांच्या आर्थिक उन्नतीचा विचार घेऊनच संचालक मंडळ काम करील. सभासदांच्या अडचणी समजावून घेवून त्या सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहील.’

———————————————–

सुकाणू व संचालक मंडळाने दिलेल्या संधीचे शतशः आभार- गजानन कांबळे

सुकाणू व संचालक मंडळाने दिलेल्या या संधीबद्दल शतशः आभार व्यक्त करतो.सुकाणू व संचालक मंडळाने जो विश्वास टाकला तो विश्वास सार्थ ठरवून सभासदहित व बँकेच्या आर्थिक वृद्धीसाठी प्रयत्नशील राहीन.

-गजानन कांबळे-नूतन व्हा.चेअरमन

—————————————–

     या निवडीप्रसंगी संचालक बाळकृष्ण हळदकर, बाळासाहेब निंबाळकर, सुनिल एडके, शिवाजी रोडे-पाटील, सुरेश कोळी, वर्षा शरद केनवडे, नंदकुमार वाईगडे, अमर वरुटे, शिवाजी बोलके, रामदास झेंडे, बाबू परीट, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम यांची उपस्थिती होती. सुकाणू समितीचे सर्वश्री रविकुमार पाटील, सुनिल पाटील, विलास चौगुले, प्रमोद तौंदकर, विविध संघटनाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, जिल्ह्यातील शिक्षक पतसंस्थाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, श्री शाहू आघाडीचे सभासद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!