आई तू सर्वकाही’ आज सांगीतिक मैफल ‘गंधार’व ‘लोकमत सखी मंच’तर्फे आयोजन
‘आई तू सर्वकाही’ आज सांगीतिक मैफल
‘गंधार’व ‘लोकमत सखी मंच’ तर्फे आयोजन
कोल्हापूर/मारुती फाळके
गंधार शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चॅरिटेबल ट्रस्ट व लोकमत सखी मंच प्रस्तुत ‘आई तू सर्वकाही’ ही वैशिष्ट्यपूर्ण व अनोखी सांगीतिक मैफिल आज गोविंदराव टेंबे देवल क्लब येथे सांयकाळी ५ वाजता अनुभवायला मिळणार आहे.
या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना प्रा. निशांत गोंधळी यांची असून येऊ घातलेल्या मातृदिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये कविता व गाण्यांच्या माध्यमातून रसिकांना आपली आई अनुभवायला मिळणार आहे.
आज सोमवार, दि. ४ मे २०२६ रोजी सायकांळी ठीक ५.०० वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, कोल्हापूर याठिकाणी ही मैफिल रंगणार आहे.
या मैफिलीमध्ये निशांत गोंधळी, प्रल्हाद जाधव, हर्षदा परीट यांचा स्वरसाज असणार आहे.
निशांत गोंधळी यांच्या माध्यमातून आईचं विश्व उलगडणाऱ्या कविताही सादर केल्या जाणार आहेत. तर शिवाजी सुतार (कीबोर्ड), केदार गुळवणी (व्हायोलिन), विक्रम परीट (ऑक्टोपॅड, पर्कशन), गणेश साळोखे (गिटार), संदेश खेडकर (तबला), यांची साथसंगत लाभणार आहे. ध्वनी संयोजन श्रीधर जाधव, प्रकाशयोजना अभिजीत मळगे आणि मंच सजावट सागर भोसले, मिलिंद अष्टेकर यांची असणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रवेश अग्रक्रमानुसार असणार आहे.
गंधार वाद्यवृंदाने गेली १५ वर्षे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संकल्पना यशस्वी केल्या आहेत. त्यामध्ये ‘को जागरति’, ‘घन ओथंबून येती’, ‘सूर निरागस हो’, ‘भक्तीचा वेलू गगनावरी’, ‘देह भरिला विठ्ठल’, ‘भावरंग’, ‘आम्हां नादी विठ्ठलु’, ‘पाऊलखुणा महाराष्ट्राच्या’, ‘भक्तिरंग’, ‘नभ उतरू आलं’ या कार्यक्रमांचा समावेश असून ‘आई तू सर्वकाही’ या मैफिलीचाही रसिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन गंधार शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष निशांत गोंधळी यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी : निशांत गोंधळी 9049957278 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.










