सदैव खंडेराव जगदाळे यांच्या पाठीशी राहू- सतेज ऊर्फ बंटी पाटील
वाढदिवसानिमित्त रंगला स्नेहमेळावा
कोल्हापूर/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य (कायम)विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या पाठीशी भविष्यात सदैव राहू अशी ग्वाही माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.कृती समितीच्या वतीने जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे संपन्न झाला व सपत्निक सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
गेल्या २५ वर्षांपासून अहोरात्र विनाअनुदानित शाळा व शिक्षक यांच्या साठी झटणाऱ्या जगदाळे यांच्या कार्याचा सर्व वक्त्यांनी उल्लेख केला.खंडेराव जगदाळे यांनी सद्या विना तथा अंशतः अनुदानित शिक्षक यांची व्यथा मांडत असताना रिटायर होण्यापूर्वी तरी किमान आम्हाला १००% मिळाले पाहिजे,मेडिक्लेम योजना,जुनी पेन्शन व १५ मार्च २०२४ संच मान्यता जाचक शासन निर्णय हा निर्णय रद्द झाला पाहीजे.सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० होणे आवश्यक आहे,हे मुद्दे जगदाळे सर यांनी प्रकर्षाने मांडले. बंटी पाटील यांनी जगदाळे सर यांचे कार्य व संघर्ष खूप मोठा असून मी सदैव त्यांच्या सोबत असेन अशी ग्वाही दिली.
शिक्षकांचे प्रश्न येणाऱ्या काळात निश्चित सोडविण्यात येतील,यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर,माजी शिक्षक आमदार भगवान आप्पा साळुंखे,शिक्षक नेते दादा लाड, राहुल पोवार, आर वाय पाटील, अनिल घाटगे, बी बी बोराडे, सुनील पाटील,के बी पोवार, बी जी काटे, बाबा पाटील, मेजर के एम भोसले,प्रेमकुमार बिंदंगे, संदीप काळे, राजशेखर म्हामाणे, अमरसिंह खांडेकर,शिवाजी कुरणे, केदारी मगदूम,सुरेखा शिंदे,नेहा भुसारी,गौतमी पाटील,जयश्री पाटील,भाग्यश्री राणे, मुक्ता मोटे, सरिता जगदाळे यांच्यासह सातारा,सांगली,सोलापूर, औरंगाबाद जिह्यातील विविध संघटना पदाधिकारी व अंशतः अनुदानित शिक्षक उपस्थित होते.
(फोटो ओळी-महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात खंडेराव जगदाळे यांचा सपत्नीक सत्कार करताना माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील,सोबत शिक्षक आमदार जयंत तासगावकर,माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे,शिक्षक नेते दादा लाड, आदी मान्यवर.)










