March 16, 2026

जुनी पेन्शनसाठी २२ मार्चला कोल्हापुरात  जुनी पेन्शन संघटनेची राज्य सहविचार सभा-राज्याध्यक्ष वितेश खांडेकर   सभा यशस्वी करण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज-मंगेश धनवडे

0
IMG-20260316-WA0079

जुनी पेन्शनसाठी २२ मार्चला कोल्हापुरात  जुनी पेन्शन संघटनेची राज्य सहविचार सभा-राज्याध्यक्ष वितेश खांडेकर

  सभा यशस्वी करण्यासाठी
कोल्हापूरकर सज्ज-मंगेश धनवडे

कोल्हापूर/मारुती फाळके

राज्यातील बलाढ्य संघटन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची अत्यंत महत्त्वाची राज्य सहविचार सभा रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली असून या सभेत जुन्या पेंशन बाबत धोरणात्मक व रचनात्मक कार्यक्रम ठरवला जाणार असल्याची माहिती संघटनेचे राजाध्यक्ष वितेश खांडेकर यांनी दिली. तसेच ही सहविचार सभा यशस्वी करण्यासाठी जुनी पेंशन संघटना कोल्हापूर जिल्हा व तालुका शाखा सज्ज असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी दिली.

या सभेत संघटनेच्या पुढील दिशा व धोरणांवर सविस्तर चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.जुनी पेंशन चा सरकारला निर्णय घेण्यासाठी संघटनेची पुढील दिशा व भूमिका, कर्मचाऱ्यांच्या विविध संवर्गातील प्रलंबित समस्या, जिल्हानिहाय कामाचा आढावा, तसेच संघटनात्मक बांधणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या या राज्यस्तरीय सहविचार सभेला सर्व राज्य
व पदाधिकारी, विभाग पदाधिकारी जिल्हाध्यक्ष यांनी अनिवार्य उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई विभाग अध्यक्ष भाऊसाहेब घाडगे यांनीही मुंबई विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जुनी पेन्शनच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन केले आहे. जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असून, या आंदोलनाला अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.

——————————————————

चौकट-
सहविचार सभा कोल्हापूरकर यशस्वी करणार -जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे

कोल्हापुरात प्रथमच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची सहविचार सभा येत्या २२ मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या सभेबाबतचे नियोजन व प्रत्यक्ष कृती कार्यक्रम तयार असून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा शाखा व सर्व तालुका कार्यकारणी ही सहविचार सभा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या सभेमधून जुनी पेन्शन तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या बाबत योग्य विचार विनिमय होईल.,असा ठाम विश्वास वाटतो. कोल्हापुरातून होत असलेली ही सभा जुन्या पेन्शनसाठी सकारात्मक ऊर्जा देईल.

–मंगेश धनवडे
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!