May 14, 2026

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्रशाळा पट्टणकोडोलीत ‘ग्रंथरत्न डॉ. बाबासाहेब’ ग्रंथ प्रदर्शन

0
IMG-20260413-WA0028

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्रशाळा पट्टणकोडोलीत ‘ग्रंथरत्न डॉ. बाबासाहेब’ ग्रंथ प्रदर्शन

२०० च्या वर ग्रंथाचा संग्रह

पट्टणकोडोली/प्रतिनिधी

शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानदानाची परंपरा असलेली उपक्रमशील केंद्रीय प्राथमिक शाळा पट्टणकोडोली ता.हातकणंगले या प्रशालेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ‘ग्रंथरत्न डॉ. बाबासाहेब’ या बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन शाळेत केले आहे.दोन दिवस हे प्रदर्शन पालक-विद्यार्थ्यांसाठी खुले राहणार आहे.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, कायदे तज्ञ, मानवतावादी विचारवंत तसेच एक व्यासंगी अभ्यासक व सुधारक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा लौकिक आहे. अशा या महामानवाच्या जयंतीला आज-काल केवळ उत्सवाचे स्वरूप प्राप्त होत आहे. अशावेळी बाबासाहेबांच्या विविध ग्रंथांचा तसेच तुमच्या जीवनावर लिहिलेल्या विविध साहित्याचा विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही परिचय व्हावा, आणि त्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी या भूमिकेतून केंद्रीय प्राथमिक शाळा पट्टणकोडोलीने उपक्रमाचे आयोजन केले आहे.

या उपक्रमांतर्गत बाबासाहेबांचे विचार, जीवन व कार्य यांचा परिचय करून देणारे २०० हून अधिक ग्रंथांचे प्रदर्शन केले. ग्रंथ प्रदर्शनास शिक्षण विस्तार अधिकारी भूपाल मंडगे, केंद्रप्रमुख राजेश पाटील यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

    मुख्याध्यापिका मृणालिनी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमास शशिकांत खांडेकर, सुनील स्वामी, सचिन पाटोळे, मारुती फाळके, विकास माळगे, देवदत्त कुंभार यांनी ग्रंथ देऊन मोलाचे सहकार्य केले.ग्रंथ प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक प्रकाश कांबळे,मिनाज मुजावर,संगीता कोळी, चंद्रभागा देशमुख,महादेव चौगुले व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!