भेडसगाव नागरी पतसंस्थेला २ कोटी ५० लाखाचा नफा संस्थापक चेअरमन – हंबीरराव पाटील -भेडसगावकर
‘सहकारातील मानबिंदू गौरव पुरस्कार प्राप्त भेडसगाव नागरी पतसंस्था’
भेडसगाव/प्रतिनिधी
ग्राहकाभिमुख पारदर्शी कारभार व सभासदांचा विश्वास संपादन करत ग्रामीण भागातून शहरी भागाकडे दमदार वाटचाल करणारी, महाराष्ट्र शासनाचा सहकारातील मानबिंदू गौरव पुरस्कारप्राप्त भेडसगाव नागरी पतसंस्थेला यंदाच्या आर्थिक वर्षात २ कोटी ५० लाखाचा नफा झाल्याची माहिती संस्थापक चेअरमन, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील -भेडसगावकर यांनी दिली.
संस्थेच्या ग्राहकाभिमुख पारदर्शी कारभारावर विश्वास टाकत ठेवीमध्ये १४.७१% वाढ होऊन संस्थेने २०६ कोटी ठेवीचा टप्पा पार केला आहे. कर्ज वाटपामध्ये १५.२६% वृद्धी होऊन १४२ कोटी ४९ लाखाचे कर्ज वाटप केले असून पैकी सोने तारण व ठेव तारण ६५ कोटी ९२ लाख आहे. संस्थेची एकूण तरलता – एकूण ठेवी २०६.५२ कोटी असून रोख व बँक शिल्लक रु. ५.७७ कोटी, गुंतवणूक रु.८६.१२ कोटी, ठेवतारण कर्जे रु. ६.७३ कोटी व सोनेतारण कर्जे रु.५९.३५ कोटी यांची एकत्रित रक्कम रु.१५७.७७ कोटी असून याचे एकूण ठेवीशी प्रमाण ७६.३९% इतके आहे. कर्ज वसुलीचे प्रमाण ९८.१०% असून थकबाकीचे प्रमाण १.९०% इतके आहे. संस्थेच्या एकूण व्यवसायामध्ये १४.९३% वाढ होऊन ३४९ कोटी ०१ लाख इतका विक्रमी व्यवसाय झाला आहे.
संस्थेने सध्या एकूण ठेवीच्या ८६ कोटी १२ लाख इतकी गुंतवणूक इतर बँकात केली आहे. सातत्याने संस्थेचा ऑडीट वर्ग अ आहे. भागभांडवल व निधी २२ कोटी ३५ लाख असून प्रतिवर्षी सभासदांना १०% लाभांश दिला जातो. पुढील आर्थिक वर्षात ३०० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करण्याचे संस्थेचे उद्धिष्ट आहे. संस्थेतर्फे मयत सभासदाच्या वारसांना विशेष सवलत, आजारी सभासदांना मदत निधी, संस्था कर्मचारी व सभासद यांना ३ लाखाचा मेडीक्लेम व संस्था कर्मचाऱ्यांचा १० लाखाचा विमा संस्थेने उतरविला आहे.
संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून संस्थेच्या राज्यात २१ शाखा कार्यरत आहेत. पनवेल जि. रायगड व साळवण ता. गगनबावडा जि. कोल्हापूर या दोन शाखा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
संस्थेला आजवर आदर्श पतसंस्था पुरस्कार, बँको व पतसंस्था फेडरेशनचे पुरस्कार मिळाले आहेत. संस्थेमध्ये सध्या मोबाईल अॅप, RTGS/NEFT सुविधा, वीज बिल भरणा सुविधा, विश्वास साखर व उदय साखर कारखाना उस बिल वितरण आदी योजना व सुविधा उपलब्ध आहेत. भविष्यात संस्थेच्या ठेवीमध्ये व कर्ज वाटपात वाढ, व्यवसायवृद्धी यावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले.
यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, संग्राम पाटील, व्हा. चेअरमन पांडुरंग डांगे,राजू कुसळे, विलास परीट, विट्ठल दाजी पाटील,आबा लगारे, आदींसह संचालक मंडळ जनरल मॅनेजर, अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.
(फोटो-हंबीरराव पाटील-भेडसगावकर संस्थापक चेअरमन)










