शिक्षक संघाने नेहमीच महिला शिक्षकांच्या सामर्थ्य आणि कर्तृत्वाचा सन्मान केला राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण
शिक्षक संघाने नेहमीच महिला शिक्षकांच्या सामर्थ्य आणि कर्तृत्वाचा सन्मान केला
राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण
कोल्हापूर/प्रतिनिधी
शिक्षक संघाने सातत्याने महिलांच्या कर्तुत्वाचा व सामर्थ्याचा सन्मान केला आहे. प्रत्येक स्त्रियांच्यात शक्ती, जिद्द व कर्तृत्व असते .महिलांनी एकमेकींचा आधार बनायला हवे. पुरस्कार हा केवळ गौरव नसून पुढे जाण्याची प्रेरणा आहे.शिक्षक संघाने नेहमीच महिला शिक्षकांचा सन्मान करण्याची परंपरा जपली आहे,असा सूर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शि द पाटील गटाच्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार सोहळ्यात उमटला.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत होत्या.कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ महिला शाखेतर्फे डॉ.व्ही.टी.पाटील स्मृती भवनात आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सल्लागार राजाराम वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली नेटक्या नियोजनात कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की म्हणाल्या ,शिक्षक व पालक यांच्या संस्कारामुळेच आयुष्यात समर्थपणे उभा राहता येते.सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना काही नियम अटी घालणे आवश्यक आहे. पालकांनी सजग राहयला हवे.
प्रमुख पाहुण्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर म्हणाल्या, महिलांनी स्वतःला कमी न समजता समाजात समर्थपणे राहायला शिकले पाहिजे. महिला सशक्त असतात त्यांनी आत्मविश्वासाने पुढे यायला हवे.
यावेळी मुख्याध्यापिका चित्रलेखा कुलकर्णी, स्वाती दरबान,पुनम मोहिते ,अस्मिता कुलकर्णी ,निर्मला सावंत आदी ३९ महिला शिक्षिकांना राजमाता जिजाऊ आदर्श महिला शिक्षिका पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्या शोभाताई फराकटे,शिक्षक नेते राजाराम वरुटे ,संभाजी बापट, जिल्हाध्यक्ष बबन केकरे , डी.पी.पाटील,स्मिता डिग्रजे,श्वेता खांडेकर,नसीम मुल्ला, लता नायकवडे,अनिता निटवे यासह जिल्ह्यातील प्राथमिक, मनपा विभागातील असंख्य महिला शिक्षिका उपस्थित होत्या.
(फोटो ओळी-:प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडीतर्फे जि.प. अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या हस्ते महिला शिक्षिकांना राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.)










