प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी वर्षा शरद केनवडे तर उपाध्यक्षापदी पद्मजा मेढे.शिक्षक बँकेत ‘महिलाराज’
प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी वर्षा शरद केनवडे तर उपाध्यक्षापदी पद्मजा मेढे
शिक्षक बँकेत ‘महिलाराज’
कोल्हापूर/मारुती फाळके
कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था असलेल्या दि प्राथमिक शिक्षक सहकारी बैंक लि; कोल्हापूर च्या अध्यक्षपदी वर्षा शरद केनवडे तर उपाध्यक्षपदी पद्मजा तानाजी मेढे यांची निवड करण्यात आली. बँकेची संचालक मंडळाची सभाआज बँकेच्या सभागृहात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकरिता युसुफ अ. शेखसो, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर अध्यासी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न आली,या सभेत या निवडी करण्यात आल्या.
सभेमध्ये अध्यक्षपदी वर्षा शरद केनवडे, ता. करवीर यांचे नांव श्री. नंदकुमार तुकाराम वाईंगडे यांनी सुचविले तर त्यास श्री. गजानन सखाराम कांबळे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षा पदी सौ. पद्मजा तानाजी मेढे, ता. करवीर यांचे नांव अर्जुन दिनकर पाटील यांनी सुचविले व त्यास श्री. रामदास शामराव झेंडे यांनी अनुमोदन दिले.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अन्य कोणाचीही नामनिर्देशन प्रत्रिका नसलेने अध्यासी अधिकारी मा.श्री.युसुफ अ. शेखसो यांनी सौ. वर्षा शरद केनवडे यांची अध्यक्षा पदी तर सौ. पद्मजा तानाजी मेडे यांची उपाध्यक्षापदी बिनविरोध निवड आलेचे जाहीर केले.
——————————————–
बँकचे संचालक व सुकाणू समितीचे सर्व पदाधिकारी यांचे मी आभार मानते व त्यांना धन्यवाद देते. या संधीचा मी बँकच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीन. अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये बँकेचा कारभार पारदर्शी होण्यासाठी आणि बँकेचा व्यवसाय व ठेवींमध्ये वाढ होण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. वचननाम्याच्या पूर्ततेसाठी सकारात्मक उर्जा घेऊन सभासदांच्या आर्थिक उन्नतीचा विचार घेऊनच संचालक मंडळ काम करील. सभासदांच्या अडचणी समजावून घेवून त्या सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहील.
–सौ.वर्षा केनवडे
नूतन चेअरमन शिक्षक बँक
सभेस संचालक सर्वश्री बाळकृष्ण हळदकर, बाळासाहेब निंबाळकर, राजेंद्रकुमार पाटील, सुनिल एडके, अर्जुन पाटील, शिवाजी रोडे-पाटील, सुरेश कोळी, एस. व्ही. पाटील, नंदकुमार वाईंगडे, अमर बरुटे, शिवाजी बोलके, गजानन कांबळे, रामदास झेंडे, गौतम वर्धन तसेच सुकाणू समितीचे सर्वश्री जोतीराम पाटील, रविकुमार पाटील, सुनिल पाटील, विलास चौगुले, प्रमोद तौंदकर, रघुनाथ खोत, संजय कुईकर, राज्यनेते उद्यजी शिंदे, महासचिव राजन कोरगांवकर, उपाध्यक्ष राजनजी सावंत, दादा जांभवडेकर, विविध संघटनाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, जिल्ह्यातील शिक्षक पतसंस्थाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, श्री शाहू आघाडीचे सन्माननीय सभासद तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजयकुमार मगदूम उपस्थित होते.
सभेच्या अध्यक्ष मा. श्री. युसुफ अ. शेखनो यांनी सभा खेळीमेळीत व शांततेत पार पाडल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार मानून निवडीचा कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले. त्यानंतर नूतन अध्यक्षा व उपाध्यक्षा यांचे अभिनंदनपर संचालक व मुकाणू समितीची भाषणे झाली.
चौकट १.
महिला चेअरमन पदाचा शब्द खरा करून दाखवला!
सध्याच्या सत्ताधारी मंडळी व सुकाणू समितीने महिला चेअरमन करण्याचा शब्द सभासदांना दिला होता., तो शब्द सुकाणू समिती व सत्ताधारी मंडळींनी महिला चेअरमन करून दाखवण्याचा शब्द खरा करून दाखवला. सध्याच्या ५ वर्षाच्या चेअरमन पदावर पहिल्यांदाच वर्षा केनवडे यांच्या रूपाने पहिल्यादाच महिलेला संधी मिळाली.
चौकट-२.
पद्मजा मेढे यांना तीन वेळा व्हा. चेअरमन पदाची संधी
शिक्षक बँकेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीत शिक्षक संघ थोरात गटाकडून निवडून आलेल्या पद्मजा मेढे यांना या पाच वर्षाच्या कालावधीत तीन वेळा व्हा. चेअरमन पदाची संधी मिळाली.सुकाणू समितीने त्यांना ३ वेळेस या पदाची संधी देत त्यांचा सन्मान केला.
(फोटो ओळी-नूतन अध्यक्ष वर्षा केनवडे,उपाध्यक्षा पद्मजा मेढे यांचा सत्कार करताना संचालक मंडळ)










