March 16, 2026

जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील-भेडसगावकर यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट!

0
IMG-20260316-WA0067(1)

जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील-भेडसगावकर यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट!

भेडसगाव/प्रतिनिधी

शिवसेना उबाठा गटातून जिल्ह्यातून एकमेव ६२५३ इतक्या विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले सरूड जिल्हा परिषद मतदारसंघातील सदस्य अमरसिंह पाटील-भेडसगावकर यांनी पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

जिल्हा परिषद निवडणुकीत शाहूवाडी तालुक्यात माजी आमदार सत्यजित पाटील गटातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झालेले जिल्ह्यातील एकमेव सदस्य आहेत. मुंबई येथे मातोश्री वर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान अमरसिंह पाटील यांनी निवडणुकीतील विजयाबद्दल उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. तसेच सरूड-शाहूवाडी परिसरातील विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत तालुक्यातील विविध विकासकामे राबविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे अमरसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनीही अमरसिंह पाटील यांचे अभिनंदन करत मतदारसंघ व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावे, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना केल्या.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नामदेव गिरी, विजय देवणे,जिल्हाप्रमुख संजय चौगुले, साताप्पा भवन, बाजीराव पाटील, तसेच सरूड -शाहूवाडी परिसरातील शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या भेटीमुळे शाहूवाडी-पन्हाळा परिसरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!