सेवानिवृत्त सभासद आजीव ठेवण्याचा निर्णय–चेअरमन दिपाली भोईटे
करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
कोल्हापूर/मारुती फाळके
सेवानिवृत्त सभासद आजीव राहण्याचा ठराव,मयत सभासद कल्याण निधी मध्ये वाढ,३५ लाख रुपये पर्यंतचे कर्ज अवघ्या ९% टक्के व्याजदराने,१५% डिव्हिडंड, असे अनेक सभासद हिताचे निर्णय घेत असल्याची घोषणा चेअरमन दिपाली भोईटे यांनी केली.त्या करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होत्या.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सभा संपन्न झाली. सभेत सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक पदी पदोन्नती झालेले शिक्षक, नवनियुक्त शिक्षक , सेट नेट सह उच्च शैक्षणिक अहर्ताधारक शिक्षक ,आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक तसेच कला क्रीडा शिक्षण क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. एच. पाटील होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डाएटचे सेवानिवृत्त प्राचार्य आय सी शेख, उपशिक्षणाधिकारी एस के यादव, मनपा प्रशासन अधिकारी आर व्ही. कांबळे, प्राथमिक शिक्षण विभाग अधीक्षक उदय सरनाईक, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव आकुर्डेकर, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. मधुकर पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपशिक्षणाधिकारी एस. के. यादव म्हणाले, सहकार टिकला पाहिजे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून शिक्षकांच्या आर्थिक अडचणी सुटल्याने शिक्षक चांगल्या प्रकारे ज्ञानदानाची सेवा बजावू शकतात असे मत मांडले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना बी एच पाटील म्हणाले, शिक्षक नेते कृष्णात कारंडे व शिक्षक बँकेचे संचालक सुरेश कोळी यांनी ही संस्था मोठ्या कष्टाने नावारूपाला आणली आहे. संस्थेचा कारभार खूपच आदर्श असून भविष्यात अजून चांगल्या सभासद हिताच्या योजना राबवण्याचा प्रयत्न करावा.
शिक्षक समितीचे नेते
कृष्णात कांरडे यांनी संस्थेच्या प्रगतीची वाटचाल ही आपल्या सर्व सभासदांच्या विश्वासावर व संस्थेवरील प्रेमामुळे शक्य आहे, यापुढे आपले सहकार्य असेच मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिक्षक बँकेचे संचालक सुरेश कोळी म्हणाले, संस्था विविध माध्यमातून ३५ लाख रुपये पर्यंतचे कर्ज अवघ्या ९% व्याजदराने उपलब्ध करून देते, तर ८% दराने ठेवी स्वीकारते. अवघ्या एक टक्के मार्जिन मध्ये राहून १५% डीव्हिडड व दिवाळी भेट सभासदांना देते. त्यामुळे भविष्यात आपल्या संस्थेला आपण सर्वांनी आणखीन मोठे करूया असे आवाहन केले.
यावेळी बोलताना चेअरमन दिपाली भोईटे यांनी संस्थेचे अहवाल वाचन केले. तसेच गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असणारी मयत सभासद कल्याण निधी योजनेमध्ये वाढ करण्याबाबतची मागणी मंजूर करत असल्याची घोषणा केली. संस्थेमध्ये २५ हजार रुपये ठेवीमध्ये सध्या ४ लाख रुपये कर्जमाफी दिली जात होती, ती कर्जमाफी वाढवून ७ लाख करण्यात आली. म्हणजेच जर कर्ज असेल तर ७ लाख रुपये कर्जमाफी आणि कर्ज नसेल तर किमान ३ लाख रुपये रोखीने मदत मिळेल असे घोषित केले.
संस्थेचे सभासद व सध्या तज्ञ संचालक संतोष गायकवाड यांनी या योजनेबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. आज या सर्वसाधारण सभेत ही योजना मंजूर केल्याबद्दल सन्माननीय नेते चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
यावेळी शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन रामदास झेंडे ,शिक्षक बँकेच्या संचालिका राज्याध्यक्ष वर्षा केनवडे ,शिक्षक बँक संचालक गौतम वर्धन, ल रा हजारे पतसंस्थेचे चेअरमन शरद केनवडे ,संस्थेचे संचालक यशवंत चौगुले , सुकुमार मानकर , धनाजी सासणे , धनाजी पाटील , बाळासो कांबळे , राजेंद्र तोदकर, प्रताप पाटील, दीपक पाटील, चंद्रकांत पाटील, संदीप मगदूम, सचिन पावसकर, गीता कोळी , अजित खाडे, संगीता अलगौंडर तसेच सल्लागार व सुकाण समितीचे मार्गदर्शक शब्बीर आवटी, दिलीप खाडे , शिवाजी लवटे, शामराव कुंभार , मधुकर जाधव, सूर्यकांत पाटील, पंडित पाटील ,शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर, करवीर सरचिटणीस बाबा धुमाळ, दिलीप पाटील,विवेक जनवाडे, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष बाबुराव निकम, सरचिटणीस आनंदा बनकर , मुरली कुंभार , गोरखनाथ पाटील , नितीन कांबळे, सचिन सुतार, सचिन हजारे,राहुल चौगले, अमोल चव्हाण,गजानन मोरे, यासह अनेक शिक्षक बांधव उपस्थित होते.
सभेचे स्वागत धनाजी सासणे, सूत्रसंचालन दत्तात्रय शिंदे व सादिया मुजावर
तर आभार व्हा.चेअरमन शशिकांत धुत्रे यांनी केले.कार्यक्रमास शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट-
‘बहुमत’
सेवानिवृत्त सभासदांना आजीव सभासद ठेवण्याचा हा जनरल सभेतील महत्त्वाचा विषय होता.कारण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ठेव संस्थेत आर्थिक भक्कम पाया आहे.सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी याना आजीव सभासद राहण्याबाबत चा ठराव विद्यमान संचालक मंडळाने बहुमताने मंजूर करत सेवानिवृत्त सभासदाना दिलासा दिला.
मयत कल्याण सभासद निधीची मर्यादा ४ लाखावरून ९ लाख असे दोन सभासद हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेत सभासदांना खुश केले.
फोटो ओळी-
संस्थेचे सभासद शिवाजी आळवेकर यांची कन्या ऋचा आळवेकर हिची जिल्हा क्रीडा अधिकारीपदी नेमणूक झाल्याबद्दल सत्कार करताना बी.एच.पाटील, डायटचे माजी प्राचार्य इकबाल शेख, शिक्षक नेते कृष्णात कारंडे,संस्थेचे चेअरमन दिपाली भोईटे,व्हा. चेअरमन शशिकांत धुत्रे, शिक्षक बँकेचे संचालक सुरेश कोळी,प्रा. मधुकर पाटील,संचालक सुकुमार मानकर, धनाजी सासणे व इतर संचालक मान्यवर.










