May 14, 2026

शिवाजी रोडे-पाटील गृहतारण संस्थेचा दीपावली भेटवस्तू वाटप कार्यक्रम उत्साहात

0
IMG-20251019-WA0048

शिवाजी रोडे-पाटील गृहतारण संस्थेचा दीपावली भेटवस्तू वाटप उत्साहात

भेडसगाव/प्रतिनिधी

शिक्षक नेते शिवाजी रोडे-पाटील गृहतारण सहकारी संस्था मर्यादित सरूड ता.शाहूवाडी,या संस्थेचा ‘५ लिटर जेमिनी तेल’ या दिवाळी भेट वस्तू प्रदान कार्यक्रम,
माजी आमदार सत्यजित  पाटील(आबा)
यांचे शुभहस्ते नुकताच संस्थेच्या मुख्य शाखेमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी बोलताना माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, अल्पावधीत संस्थेने शिक्षक सभासदांचा विश्वास संपादन करत आर्थिक वृद्धी केली आहे. संस्थेच्या ठेवी आणि कर्ज वाटपामध्ये सातत्याने वाढ होत असून हे सहकारी संस्थेच्या प्रगतीचे लक्षण असल्याचे माजी आमदार पाटील यांनी गौरवउद्गार काढले.याबद्दल त्यांनी संस्थेच्या नेतृत्व करणाऱ्या मंडळींचे व सर्व संचालक मंडळांचे चांगल्या कारभाराबद्दल अभिनंदन केले आणि भविष्यातल्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत संस्थेच्या शाहूवाडी शाखेचे अध्यक्ष दिलीप भोसले यांनी केले.
संस्थेला यावर्षी १७,२९,५७६/- रुपये इतका नफा झाला असून सभासदांना ११ टक्के लाभांश रोख वाटप केले व दीपावली भेटवस्तू वाटपासाठी केलेली तरतूद रूपाने १२ टक्के असा एकत्रित २३ टक्के डिव्हिडंड वाटप करण्यात आला असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा संजीवनी सुर्वे यांनी जाहीर केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या बांबवडे शाखा अध्यक्ष प्रकाश पाटील(सोनवडेकर) यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन शिवाजी रोडे-पाटील यांनी संस्थेच्या भावी योजनांबाबत माहिती दिली तर संस्थेचे संस्थापक हेमंत भालेकर यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या प्रगतीचा लेखा जोखा मांडला.संस्थेने रु.२८ कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे.तसेच संस्थेने स्वमालकीच्या इमारतीसाठी अडीच गुंठे प्लॉट खरेदी केल्याचे सांगितले.

यावेळी संचालक भानुदास माने,विजय गुरव,संजय पाटील,सुनील नलगे,दिनकर कांबळे,गणपती पाटील,उमरफारुक आत्तार,अंकुश पाटील,सुभाष सुतार,मारुतीसिंह ऱ्हाटवड,चंद्रशेखर जंगम,समीर गुरव,कमल दिंडे,जयश्री मगदूम,कलावती येळवणकर
यावेळी उत्तम खुटाळे,आनंदराव हारुगडे,मधुकर पाटील,नाना कांबळे,किरण शिंदे,संभाजी साठे,अमर पाटील,रमेश कांबळे,तसेच सर्व शाखांचे संचालक मंडळ,सल्लागार मंडळ,सभासद बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक विजयकुमार गावडे यांनी तर आभार व्हा. चेअरमन जयश्री कुंभार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!