March 14, 2026

कास्ट्राईब’ च्या उद्या वतीने महात्मा फुले स्मृतीदिन व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा

0
IMG-20251127-WA0081(1)

कास्ट्राईब’ च्या उद्या वतीने महात्मा फुले स्मृतीदिन व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा

महात्मा फुलेंचा स्मृतीदिन हाच खरा शिक्षक दिन- गौतम वर्धन

कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित रहावे.

कोल्हापूर/मारुती फाळके

कास्ट्राईब शिक्षक संघटना, कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे क्रांतिबा जोतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदा वीस शिक्षकांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. तर क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल विशेष क्रीडा पुरस्कारही देण्यात येणार आहे.संघटनेच्या वतीने सलग १३ वर्ष हे कार्य सातत्याने सुरू आहे. शुक्रवारी, (२८ नोव्हेंबर २०२५) दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे दुपारी बारा वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याची माहिती कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष नामदेवराव कांबळे व कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन यांनी पत्रकार परिषेदत दिली.

महात्मा फुले यांचा १३५ वा स्मृतिदिन व संविधान सोहळ्या निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व सिनीअर कॉलेजमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांची निवड केली आहे. मानपत्र, शाल, श्रीफळ, फेटा व पुस्तक भेट असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यंदा कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे. यंदा,

   आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त:

बिद्री येथील केंद्रप्रमुख संजय कोंडिबा कुडूकर, संजय लक्ष्मण परीट, भोगावती महाविद्यालय कुरुकली येथील उपप्राचार्य डॉ. दिलीप लहू कांबळे, करवीर तालुक्यातील विद्या मंदिर गणेशवाडी येथील अध्यापिका रुपाली राजेंद्र कुंभार, विद्या मंदिर जेऊर येथील विषय शिक्षक अविनाश विष्णू माने, दुर्गमानवाड येथील केंद्र प्रमुख एकनाथ शंकर कांबळे, आजरा तालुक्यातील विद्या मंदिर गणेशवाडी येथील सुरेश तुकाराम देशमुख, विद्या मंदिर मिणचे खुर्द येथील किशोर रामचंद्र कासार, विद्या मंदिर तुर्केवाडी येथील विनायक बाबूराव प्रधान, हातकणंगले तालुक्यातील विद्या मंदिर न्यू राजापूर येथील प्रशांत श्रीकांत जयकर, विद्या मंदिर अतिग्रे येथील विषय शिक्षक तुकाराम गणपती माने, कुमार विद्या मंदिर हेब्बाळ येथील सरिता राजाराम कांबळे, विद्या मंदिर गेळवडे येथील नंदकुमार महिपती कांबळे, श्री जिनगोंडा बाळगोंडा हायस्कूल चिपरी येथील धनपाल दत्तात्रय कागवाडे, केंद्रीय शाळा नांदणी येथील संतोष विलास कांबळे यांना जाहीर झाला आहे.
सातारा जिल्ह्यातल विद्या मंदिर कुसखुर्द येथील बाळकृष्ण आनंदराव भंडारे, सांगली जिल्ह्यातील ज्युबिल कन्या शाळा मिरज येथील विद्याधर जगन्नाथ रास्ते, रत्नागिरी जिल्ह्यातील रा. भा. शिर्के प्रशाला येथील प्रशांत चंद्रकांत जाधव, एन. के. वराडकर हायस्कूल मुरुड येथील मुख्याध्यापक प्रमोद प्रभाकर गमरे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालय माडखोल येथील संजीव शंकर मोहिते यांना आदर्श शिक्षक पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. जलतरणमधील कामगिरीबद्दल सिद्धान्त पांडूरंग भोसले यांना विशेष क्रीडा पुरस्कार दिला जाणार आहे.

कार्यक्रमाला सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कास्ट्राप शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन व जिल्हा सरचिटणीस संजय कुर्डूकर यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला संजय कुर्डूकर,जिल्हा उपाध्यक्ष विजय कांबळे-चौकाककर, आकाराम कांबळे, बाबासाहेब कांबळे, दिनकर जगदीश,जनार्दन कोतेकर,पी डी सरदेसाई आदी उपस्थित रहावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!