२४ नोव्हेंबर ला गोविंदराव टेंबे रंगमंदिर मध्ये रंगणार नाईन्टीज मेलडी संगीत मैफिल
गायक शिक्षक मंचचा सातवा वर्धापन दिन
२४ नोव्हेंबर ला गोविंदराव टेंबे रंगमंदिर मध्ये रंगणार नाईन्टीज मेलडी संगीत मैफिल
कोल्हापूर/मारुती फाळके
गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब थेथे मध्ये सोमवार दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नव्वदीच्या दशकातील सदाबहार गीतांची नाईन्टीज मेलडी संगीत मैफिल संपन्न होणार असून कार्यक्रमास प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गायक शिक्षक मंचाचे एडमिन राजेंद्र कोरे व बाळ डेळेकर यांनी केले आहे.
शिक्षण क्षेत्रातील अधिकारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हक्काचं व्यासपीठ असलेल्या गायक शिक्षक मंचाचा सातवा वर्धापन दिन संपन्न होत असून गेल्या सात वर्षापासून मिले सूर मेरा तुम्हारा, चित्रहार, आर. डी बर्मन स्पेशल, द म्युझिकल ट्रिब्यूट टू ऋषी कपूर अँड मोहम्मद अजीज, मंगल गाणी दंगल गाणी अशा एकापेक्षा एक मराठी हिंदी गीतांच्या संगीतमय मैफिलींचे सादरीकरण मंचाच्या अधिकारी व शिक्षक सदस्यांनी सादर केले आहे.
गीत गायनाबरोबर गायक शिक्षक मंचाने सामाजिकभान ही जपले आहे. समाजातील गरजू व वंचितांसाठी पाच लाखांपेक्षा जास्त निधी उभा करत मदत ही केली आहे.
नव्वदीच्या दशकातील कुमार सानू, उदित्त नारायण, एसपी.बालसुब्रमण्यम, हरीहरन,सोनू निगम, महम्मद अजीज,सुरेश वाडकर,लता मंगेशकर, आशा भोसले, अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमुर्ती, साधना सरगम यांच्यासह विविध गायकांनी अजरामर केलेल्या गीताचे सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात येणार असून प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे संयोजकांनी केले आहे.
——————————
“सामाजिक बांधिलकी जपणारा गायक शिक्षक मंच”
एका विधायक भावनेतून शिक्षकांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उदात्त हेतूतून “गायक शिक्षक मंचाची” स्थापना केली. गायक शिक्षक मंच हा केवळ ‘मनोरंजनासाठी कला’ हा हेतू डोळ्यासमोर ठेवून कार्यरत नसून या मंचाच्या माध्यमातून आजवर सामाजिक उपक्रम राबविले आहेत.कोरोना, महापूर यासारख्या आपत्तीमध्ये समाजातील अनेक दुःखितांचे अश्रू पुसण्याचे काम मंचांने केले आहे. कोल्हापुरातील प्रसिद्ध ढोलक वादक प्रफुल्ल शेंडगे यांचे अकाली निधन झाले. सामान्य परिस्थिती असणाऱ्या या कलावंताच्या निधनाने त्यांचे कुटुंब पोरके झाले;अशा काळाने घाला घातलेल्या परिस्थितीमध्ये गायक शिक्षक मंचाने प्रफुल्ल शेंडगे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीच्या भावनेतून आधार देण्याचा प्रयत्न केला. गायक शिक्षक मंचाचे ‘सामाजिक बांधिलकीचे’ कार्य मंचाच्या माध्यमातून चालते. यापुढेही कलेबरोबरच सामाजिक हिताचा संस्कार आणि संस्कृती जोपासण्याची परंपरा मंचाच्या माध्यमातून अव्यातपणे चालू राहील.
-राजेंद्र कोरे
ग्रुप ॲडमिन- गायक शिक्षक मंच










