March 14, 2026

महात्मा फुले हे आद्य लोकशिक्षक- डॉ. अलोक जत्राटकर म.फुले स्मृतीदिन विशेष काष्ट्राईब शिक्षक’च्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

0
IMG-20251128-WA0079(1)

महात्मा फुले हे आद्य लोकशिक्षक- डॉ. आलोक जत्राटकर

म.फुले स्मृतीदिन विशेष

काष्ट्राईब शिक्षक’च्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

कोल्हापूर/मारुती फाळके

महात्मा फुले हे आधुनिक भारताचे आद्य लोकशिक्षक आहेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी व्यक्त केले, ते काष्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे आयोजित क्रांतीबा जोतिबा फुले स्मृतीदिन, आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काष्ट्राईब शिक्षक कर्मचारी महासंघाचे राजाध्यक्ष नामदेव कांबळे होते.यावेळी एकूण २३ शिक्षकांना क्रांतीबा जोतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

डॉ. जत्राटकर म्हणाले,महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन असून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची जाणीव ठेवून सध्याच्या समाज व्यवस्थेने आचरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.,फुलेंच्या तत्वज्ञानात शब्दप्रामाण्यवाद नाकारून बुद्धीप्रामाण्यवादाला प्रमाण मानले आहे,.म्हणूनच फुले यांचे तत्त्वज्ञान समाजाला दिशा देणारे आहे. फुले यांनी केलेले चौफेर कार्य आजच्या समाजाने नव्याने समजून घेण्याची गरज आहे. महात्मा फुले यांच्या तत्त्वज्ञानामध्ये शिवाजी महाराजांच्या सार्वभौमवादी संस्काराचे पैलू पहायला मिळतात. म्हणून सर्वांनी व्यापक अर्थाने फुलेंचे तत्त्वज्ञान आजच्या समाज व्यवस्थेने आचरणात आणण्याची गरज आहे.

आधुनिक भारताच्या शैक्षणिक आणि सामाजिक उभारणीमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचे मोलाचे योगदान आहे. फुले यांनी लोकशिक्षण, सामाजिक सुधारणा आणि धर्म चिकित्सा या माध्यमातून कृतिशील समाज शिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. देशाच्या राष्ट्रीय बांधणीला आकार देणाऱ्या १९ व्या शतकातील प्रबोधन पर्वाचे ते महत्त्वाचे अध्वर्यू होते. स्त्री शिक्षण, सामाजिक समता लोकशाही मूल्ये शूद्रातिशूद्रांची सामाजिक, आर्थिक प्रगती हे फुले यांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाचे महत्वाचे आधारस्तंभ होते. विषमतेच्या विरोधात ब्राह्मण- ब्राह्मनेतर तर अशा सर्व सहकार्यांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. फुले यांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. पुणे महानगरपालिकेचे कमिशनर म्हणून आणि बांधकाम कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी अनेक पायाभूत सुविधा, बांधकामाच्या उभारणीत मोठे योगदान दिले. कात्रजचा बोगदा, खडकवासला धरण, बंड गार्डन पूल ही त्यांच्या भक्कम बांधकामाची साक्षी देणारी कामे आजही दिमाखात उभी आहेत. फुले एक सच्चे राष्ट्रनिर्माते होते. याचीच प्रचिती त्यातून येते.

कार्यक्रमासाठी उपस्थित कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर म्हणाल्या, शिक्षकगुणवत्तेसाठी खूप काम करत आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांची निवड आहे. समाज विद्यार्थी पालक मोठ्या आशेने शिक्षकाकडे बघतो आहे ही मोठी जबाबदारी केवळ आपल्यातील प्रामाणिकपणामुळेच आपण पेलू शकतो शिकवण फार सोपं नाही आणि ते फार अवघडही नाही प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययनाच्या गरजेनुरूप शिकवावे लागते प्रत्येक मूल वेगळे आहे त्यासाठी शिक्षकांच्या कौशल्याला दाद द्यावीच लागेल शिक्षकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता चुकीच्या मार्गाचा अवलंब न करता समाजाचे सामाजिक भान जपावे असेही त्या म्हणाल्या लवकरच शिक्षकांच्या निवड श्रेणी आणि रिव्हर्सन प्रक्रियेसाठी सकारात्मक निर्णय घेत असल्याचेही त्यांनी शिक्षकांना संबोधित करताना सांगितले.

यावेळी आदर्श पुरस्कार शिक्षकांना मानपत्र, शाल, श्रीफळ, फेटा व पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त:

बिद्री येथील केंद्रप्रमुख संजय कोंडिबा कुडूकर, संजय लक्ष्मण परीट, भोगावती महाविद्यालय कुरुकली येथील उपप्राचार्य डॉ. दिलीप लहू कांबळे, करवीर तालुक्यातील विद्या मंदिर गणेशवाडी येथील अध्यापिका रुपाली राजेंद्र कुंभार, विद्या मंदिर जेऊर येथील विषय शिक्षक अविनाश विष्णू माने, दुर्गमानवाड येथील केंद्र प्रमुख एकनाथ शंकर कांबळे, आजरा तालुक्यातील विद्या मंदिर गणेशवाडी येथील सुरेश तुकाराम देशमुख, विद्या मंदिर मिणचे खुर्द येथील किशोर रामचंद्र कासार, विद्या मंदिर तुर्केवाडी येथील विनायक बाबूराव प्रधान, हातकणंगले तालुक्यातील विद्या मंदिर न्यू राजापूर येथील प्रशांत श्रीकांत जयकर, विद्या मंदिर अतिग्रे येथील विषय शिक्षक तुकाराम गणपती माने, कुमार विद्या मंदिर हेब्बाळ येथील सरिता राजाराम कांबळे, विद्या मंदिर गेळवडे येथील नंदकुमार महिपती कांबळे, श्री जिनगोंडा बाळगोंडा हायस्कूल चिपरी येथील धनपाल दत्तात्रय कागवाडे, केंद्रीय शाळा नांदणी येथील संतोष विलास कांबळे यांना जाहीर झाला आहे.
सातारा जिल्ह्यातल विद्या मंदिर कुसखुर्द येथील बाळकृष्ण आनंदराव भंडारे, सांगली जिल्ह्यातील ज्युबिल कन्या शाळा मिरज येथील विद्याधर जगन्नाथ रास्ते, रत्नागिरी जिल्ह्यातील रा. भा. शिर्के प्रशाला येथील प्रशांत चंद्रकांत जाधव, एन. के. वराडकर हायस्कूल मुरुड येथील मुख्याध्यापक प्रमोद प्रभाकर गमरे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालय माडखोल येथील संजीव शंकर मोहिते तसेच जलतरणमधील कामगिरीबद्दल विशेष क्रीडा पुरस्कार
सिद्धान्त पांडूरंग भोसले यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे स्वागत-प्रमुख वक्ते यांची ओळख मारुती फाळके, प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे संचालक गौतम वर्धन,सूत्रसंचालन ए एल कांबळे, शशिकांत खांडेकर तर आभार दिनकर जगदीश यांनी मानले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकाप्पा भोसले, उपशिक्षणाधिकारी आर व्ही कांबळे,गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, विस्तार अधिकारी गावडे,शिक्षक संघटनेचे रविकुमार पाटील, प्रमोद तौदंकर,जयवंत पाटील,मंगेश धनवडे, तानाजी घरपणकर, रघुनाथ खित, शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब निंबाळकर, शिवाजी बोलके, नंदकुमार वाईंगडे,अमर वरुटे, गजानन कांबळे, तसेच काष्ट्राईब संघटनेचे राजाध्यक्ष आकाश तांबे, प्रदीप वाघोदे, बाजीराव प्रज्ञावंत,जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन,सरचिटणीस संजय कुर्डुकर,तानाजी गस्ते,पी डी सरदेसाई,आकाराम कांबळे, तुकाराम संघवी,विजय कांबळे, हेमलता कुर्डूकर, छाया वर्धन ,अस्मिता साबळे, दिलीप कांबळे,सुशांत भंडारे,जयेंद्र लाटणे, सुहास कदम,अशोक कांबळे, विजय कुशान, दिनकर जगदीश, दयानंद म्हेत्तर, राजेंद्र जाधव, राखी तारळेकर, अनिता कदम,सुनंदा जगदीश, दीप्ती कांबळे, स्मिता कांबळे, पुष्पा वर्धन, अस्मिता साबळे, बी.एस कांबळे, जनार्दन कोतेकर, सर्जेराव काळे, एन एस कांबळे, बी जे गायकवाड, सुरेश कदम, सहदेव कांबळे, एम एस कांबळे, विनोद कांबळे, डी एस कौशल, गणपत गायकवाड, बाजीराव जाधव,कुलदीप चव्हाण, विनायक प्रधान, दिलीप कांबळे, डी के कांबळे, मनीष कांबळे, सुरेश देशमुख ,जी के कांबळे, संजय कांबळे,विजय कांबळे, दयानंद दीपंकर, दत्तात्रय कांबळे, एम एस कांबळे, दशरथ कांबळे, रमेश कांबळे,बी वाय कांबळे, भीमराव तराळ, विजय कांबळे, रामचंद्र कांबळे, राजेंद्र कांबळे, सिद्धार्थ कांबळे, राकेश बावडेकर, निलेश कर्णिक,
अभिजित कांबळे, प्रकाश धातूंडे, भीमराव तराळ आदी संघटनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित होते.

चौकट-१

२४/२५ च्या शासन आदेशानुसार शिक्षक निश्चिती-मीना शेंडकर

शिक्षक संघटना  वाढलेला पट विचारात घेऊन २०२५- २६ सालानुसार शिक्षक निश्चिती करा अशी मागणी करत आहेत, परंतु प्रशासन हे शासनाच्या आदेशानुसार चालते त्यासाठी शासन आदेश २४-२५ च्या नुसारच शिक्षक निश्चिती करा, असा आदेश आहे. आपण शिक्षक संघटनांनी शिक्षण संचालक स्तरावरती प्रयत्न करून सदरचा शासन आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत,माझ्याकडे नवीन नियमानुसार शिक्षक निश्चिती करण्याचे कोणतेच आदेश नाहीत असे त्या म्हणाल्या.

चौकट-२

मान्यवर- सत्कारमूर्तींना संविधान व ग्रंथ भेट देऊन अनोखा पायंडा

 सरार्स कार्यक्रमांमध्ये सत्काराचे स्वरूप निरनिराळे असते. परंतु काष्ट्राईब शिक्षक संघटनेने पुरोगामी विचारांची कास धरत समाजाला विचार देणारा पायंडा पाडत  मान्यवरांना संविधान भेट आणि पुरस्कारार्थींना डॉ. विजय काळेबाग लिखित संविधानाचे विरोधक अर्थात भारतीय लोकशाहीचे शत्रू हे पुस्तक देऊन विचारांची भेट देण्यात आली.कार्यक्रमस्थळी संघटनेच्या विधायक कृतीचे कौतुक होत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!