March 14, 2026

सरूड जिल्हा परिषद गणातून अमरसिंह पाटील- भेडसगावकर यांनी भरला अर्ज

0
IMG-20260121-WA0028

सरूड जिल्हा परिषद गणातून अमरसिंह पाटील-भेडसगावकर यांनी भरला अर्ज

भेडसगाव/प्रतिनिधी

माजी आमदार सत्यजित पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या सरूड जिल्हा परिषद मतदार संघातून भेडसगावचे लोकनियुक्त सरपंच अमरसिंह पाटील यांनी शिवसेना-उबाठा गटातून उमेदवारी अर्ज भरला.अमरसिंह हे परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील यांचे सुपुत्र होत. गेली २५ वर्ष त्यांचे या मतदारसंघावर एकहाती वर्चस्व आहे.

निवडणूक जाहीर होण्याच्या आधी दोन महिने अमरसिंह पाटील यांनी सरूड जिल्हा परिषद मतदार संघ पिंजून काढला आहे. त्यांच्या उमेदवारीवर दोन महिन्यापूर्वी शिक्कामोर्तब झाल्याने गावनिहाय त्यानी संपर्क दौरा पूर्ण केला आहे.

वडील हंबीरराव पाटील यांचे या जिल्हा परिषद गणातील प्रत्येक गावात जनसंपर्क असून वडिलांनी गेली २५ वर्षे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या समाजकारणाचा त्यांना फायदा होईल त्रिवार सत्य आहे. गेल्या २५ वर्षाच्या राजकीय इतिहासात माजी आमदार सत्यजित पाटील व माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील यांचे सरूड जिल्हा परिषद मतदार संघावर वर्चस्व कायम आहे. स्वतः हंबीरराव पाटील हे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील या एक वेळेस आणि आता पुन्हा अमरसिंह पाटील या सुपुत्राच्या रूपाने जिल्हा परिषदेचा मान मिळाला आहे.

यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील,माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील-भेडसगावकर,केडीसीसी बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड, माजी सभापती जालिंदर पाटील,दिलीप पाटील,भाई भारत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश म्हाउटकर,भेडसगाव पंचायत समिती उमेदवार माधुरी पाटील आदी उपस्थित होते.
सरूड जि.प.मतदारसंघ विकासाचे रोल मॉडेल करणार-अमरसिंह पाटील

चौकट-
सरूड जिल्हा परिषद मतदार संघात पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासाबरोबरच आरोग्य शिक्षणाच्या अद्ययावत सोयी सुविधा, तरुणांसाठी रोजगार निर्मिती,महिला सक्षमीकरण, तरुणांच्यासाठी उद्योग व्यवसायाच्या निर्मितीसाठी उपक्रम-प्रोत्साहन,दलित वस्ती विकासाच्या अभिनव योजना,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवण्याचा ध्यास आहे. सरूड जिल्हा परिषद ‘विकासाचे रोल मॉडेल’ करण्याचा मानस आहे.यासाठी जनतेने मताच्या रूपाने आशीर्वाद द्यावेत.
-अमरसिंह हंबीरराव पाटील-भेडसगावकर
सरूड जिल्हा परिषद मतदारसंघ
उमेदवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!