करवीर तालुकास्तरीय ‘शिक्षक क्रीडा स्पर्धा पर्व २’ उत्साहात संपन्न महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना करवीर शाखेतर्फे आयोजन
करवीर तालुकास्तरीय ‘शिक्षक क्रीडा स्पर्धा पर्व २’ उत्साहात संपन्न
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना करवीर शाखेतर्फे आयोजन
कोल्हापूर/मारुती फाळके
शिक्षण विभाग पंचायत समिती करवीर व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा करवीर यांच्या संयुक्त विद्यमाने बालिका दिनाचे औचित्य साधून विद्यानिकेतन क्रीडा प्रशाला शिंगणापूर या ठिकाणी करवीर तालुकास्तरीय शिक्षक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेत करवीर तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक- शिक्षिकांनी सहभाग घेऊन एक दिवस निखळ आनंदाचा साजरा केला.
स्पर्धेचे उदघाटन कोल्हापूर जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी शशिकांत बडे, शिक्षण उपसंचालक कार्यालय कनिष्ठ प्रशासन अधिकारी समरजीत पाटील,करवीर गटशिक्षण अधिकारी अर्चना पाथरे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश आंग्रे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव आकुर्डेकर,विजय ओतारी, केंद्रप्रमुख मनीषा सपाटे, राणेश्वर थोरबोले,संभाजी लोहार, शिवाजी बागडी, अतुल देवकर, आशा शेळके या मान्यवरांनी क्रीडाज्योत प्रज्वलन करून केले. जिल्हा परिषद आदर्श शिक्षक भारत माळी, अलका माळी यांच्या दातृत्वातून या क्रीडा स्पर्धेचे सर्व चषक प्राप्त झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र वडणगे टीमच्या वतीने स्पर्धेला वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. स्पर्धेचे पंच म्हणून विद्यानिकेतन क्रीडा प्रशाला शाळेच्या क्रीडा शिक्षकांनी काम पाहिले.
याप्रसंगी बोलताना शशिकांत बडे म्हणाले एखाद्या संघटनेच्या वतीने स्वतःआर्थिक स्त्रोत उभा करून अशी स्पर्धा घेणे ही खूपच चांगली गोष्ट असून जुनी पेन्शन संघटनेचे मनापासून अभिनंदन केले.
समरजीत पाटील म्हणाले, गेल्या वर्षीपासून जुनी पेन्शन संघटनेने हा चालवलेला उपक्रम स्तुत्य असून सर्व शिक्षकांनी आपल्या आरोग्याकडे यानिमित्ताने लक्ष देणे गरजेचे आहे.
करवीर गटशिक्षणाधिकारी अर्चना पाथरे यांनी बोलताना जुनी पेन्शन संघटना यांचे संघटन कार्य तसेच आजच्या क्रीडा स्पर्धा हे खूपच चांगले काम असून असेच अनेक उपक्रम संघटनेच्या वतीने भविष्यातही आयोजित केले जावेत, जेणेकरून शिक्षकांना आपल्या कलागुणांना वाव देता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. मागील वर्षी बेस्ट प्लेयर पुरस्कार प्राप्त सुरेखा नलवडे यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने मागील वर्षी आयोजित केलेल्या स्पर्धेमुळे यावर्षी झालेल्या राज्यस्तरीय थाळीफेक स्पर्धेत मला सहभाग घेता आला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारा आत्मविश्वास आणि प्रेरणा या क्रीडा स्पर्धेमुळे मिळाली त्याबद्दल जुनी पेन्शन संघटनेचे आणि या उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या संयोजक कमिटीचे कौतुक केले.
बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी बोलताना अत्यंत उत्कृष्ट आणि देखणे संयोजन आणि त्याच पद्धतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरील आनंद हेच या स्पर्धेचे यश असल्याचे सांगितले. याप्रसंगी शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष प्रमोद तौदकर, शिक्षक बँक संचालक सुनील एडके यांची मनोगते झाली. यावेळी शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे, शिक्षक बँकेचे चेअरमन शिवाजी रोडे पाटील,संचालिका वर्षा केनवडे, अमर वरुटे, रामदास झेंडे, बाजीराव कांबळे, प्रकाश खोत, राजू परिट, शरद केनवडे, बालाजी पांढरे, प्रमोद पाटील, संतोष जुगळे, प्रीतम गवंडी, बाजीराव जाधव, महावीर कांबळे, शरद केनवडे,अनिल चौगुले, यशवंत चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षक स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
जनरल चॅम्पियनशिप कणेरी केंद्र, सर्वोत्तम खेळाडू पुरुष धनाजी सासणे, सर्वोत्तम खेळाडू महिला संजीवनी कांबळे, कबड्डी पुरुष प्रथम क्रमांक आरळे, द्वितीय कणेरी,तृतीय शिरोली केंद्र, कबड्डी महिला प्रथम क्रमांक कणेरी, द्वितीय नागदेवाडी, तृतीय गडमुडशिंगी,
रस्सीखेच पुरुष प्रथम आरळे, द्वितीय कणेरी, तृतीय गांधीनगर, रस्सीखेच महिला प्रथम कणेरी, द्वितीय नागदेवाडी,तृतीय शिये, 50 मीटर धावणे पुरुष(50 प्लस वयोगट) प्रथम धनाजी सासणे, द्वितीय पंढरीनाथ पाटील, तृतीय प्रकाश पंडित पाटील, 100 मीटर धावणे (50+ वयोगट पुरुष) श्री धनाजी सासणे,श्री वसंत कदम, श्री पंढरीनाथ पाटील, 100 मीटर धावणे पुरुष (खुला ) प्रथम अमर पाटील, पंडित दुर्गुळे,प्रशांत व्हनाळे, लांब उडी पुरुष प्रथम संजय जाधव, रवींद्र जाधव, विलास तोडकर, गोळा फेक पुरुष प्रथम युवराज पाटील,जगन्नाथ शिंदे, पांडुरंग आयरेकर. थाळी फेक पुरुष राहुल गावडे,अमर पाटील जगनाथ शिंदे, 50 मीटर धावणे (50 प्लस वयोगट महिला) प्रथम ऐश्वर्या कदम, सरिता बामणे,, स्वाती बोगाळे, 100 मीटर धावणे (50 प्लस वयोगट )प्रथम ऐश्वर्या कदम, स्वाती बोगाळे, स्नेहा भोपळे, 100 मीटर धावणे महिला खुला गट प्रथम संजीवनी कांबळे, स्मिता मोहिते,सविता महाडिक थाळीफेक महिला संजीवनी कांबळे, जैनब शेख, सविता महाडिक गोळाफेक महिला प्रथम जैनब शेख, संजीवनी कांबळे,नीता पाटील लिंबू चमचा महिला प्रथम सरिता बामणे, संजीवनी कांबळे, स्मिता सरक,संगीत खुर्ची महिला सुरेखा पुजारी,विद्या देसाई,संगिता अलगौडर यांनी यश संपादन केले.
स्पर्धा संयोजनासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड, निलेश कारंडे, संजय पाटील, बाबुराव निकम, आनंदा बनकर, लक्ष्मण घावटे, नितीन कांबळे, सचिन सुतार, विठ्ठल राठोड, संतोष चिमले, राहुल चौगुले, प्रशांत देवरुखकर, चेतन शिंदे, सुनील सुतार, मिलिंद कांबळे, सचिन हजारे, राहुल झिरमिरे, सुशांत बकरे, नंदकुमार गिरीगोसावी, अरुण टिपूगडे, सदानंद शिंदे, दिनकर परीट, विलास तोडकर, भोलानाथ भोसले, नंदकुमार वड्ड, राजरत्न खाडे, बाळासाहेब गोरे, सुनील लोहार, महेश दावणे, महेंद्र कांबळे, काशिनाथ बिरुणगी, किरण तराळ, अजित पोवार, दत्तात्रय शिंदे, मुरली कुंभार, रमेश सूर्यवंशी, अमर पाटील, पांडुरंग चव्हाण, तुलसीदास मारमवार, गोरखनाथ पाटील,महिला जिल्हाध्यक्ष आरती पोवार,सादिया मुजावर स्नेहा माळी,जैनब शेख,संगिता अलगौडर, दिपाली कतगर, पुनम पाटील,संयोगिता महाजन, अनुराधा वळसंगकर, नूरजहा पेंढारी, सुनीता नागटिळक, स्वाती गावडे, स्नेहा भोपळे, रेश्मा शेख,अनुजा पाटील, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शिलेदार,महिला संघटक, देणगीदार व क्रीडाप्रेमी शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिक्षक क्रीडा स्पर्धा पर्व दोन उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविल्याबद्दल क्रीडाप्रेमी शिक्षकांच्या वतीने जुनी पेन्शन जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड व करवीर जुनी पेन्शन संघटना पदाधिकारी यांचा संयुक्त सत्कार करण्यात आला.










