March 14, 2026

‘करवीर रायडर्स’ने पटकावला चेअरमन चषकाचा बहुमान!  चेअरमन चषक क्रिकेट स्पर्धा

0
IMG-20260113-WA0003

करवीर रायडर्स’ने पटकावला चेअरमन चषकाचा बहुमान!
   ‘चेअरमन चषक क्रिकेट स्पर्धा’

शाहूवाडी तालुक्यात पहिल्यांदाच शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा

सरूड/मारुती फाळके

सरूड ता.शाहूवाडी येथे झालेल्या चेअरमन चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात अत्यंत चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात करवीर रायडर्स संघाने चंदगड संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.शिक्षक बँकेचे चेअरमन शिवाजी रोडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व वातावरणात स्पर्धा संपन्न झाल्या.

शाहूवाडी तालुक्यात शिक्षकांच्या पहिल्यांदाच संपन्न झालेल्या जिल्हास्तरावरील ‘चेअरमन चषक २०२६’ टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद किंग्ज इलेव्हन करवीर तालुका संघाने रायझिंग स्टार चंदगड संघाचा पराभव करत पटकावले.

कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष शिवाजी रोडे-पाटील यांच्या पुढाकाराने व शाहूवाडी टीचर्स क्रिकेट ग्रुप आणि राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडी शाहूवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा झाली. सरूड येथील श्री शिव-शाहू महाविद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या स्पर्धेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक व शाहूवाडी तालुक्यातील तीन व पन्हाळा तालुक्यातील दोन असे १६ प्राथमिक शिक्षकांचे संघ सहभागी झाले. प्रथमच शिक्षकांची जिल्हास्तरीय स्पर्धा होत असल्यामुळे शिक्षकांनी आपल्या संघांच्या समर्थनार्थ हजेरी लावली होती.

अंतिम सामना रायझिंग स्टार चंदगड व किंग्ज इलेव्हन करवीर यांच्यात झाला. चंदगडने प्रथम फलंदाजी करताना ७ षटकांमध्ये जिंकण्यासाठी ५३ धावांचे आव्हान दिले. करवीर संघाने आव्हान लीलया पार करत ‘चेअरमन चषक-२०२६’ पटकावला. चषक व २१ हजार रुपये बक्षीसाचे मानकरी ठरले, उपविजेत्या चंदगड संघास १५ हजार रुपये व चषक देण्यात आला.

तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी शिरोळ तालुका व गगनबावडा तालुका यांच्यात लढत झाली. गगनबावडा संघाने सहा षटकांमध्ये प्रतिस्पर्धी शिरोळ संघास ९४ धावांचे आव्हान दिले. शिरोळ संघाचा संतोष ठोमके याने २४ चेंडूत ७४ धावा करत ११ षटकारांची बरसात केली.
मात्र, या संघास पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. गगनबावडा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. संघास ११ हजार रुपये व चषक तर शिरोळ संघाने ७ हजार रुपये व चषक पटकावले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी अजिंक्य क्रिकेट क्लबचे सहकार्य लाभले. पंच म्हणून सनी कांबळे, प्रशांत खामकर, वैभव तवटे, एकनाथ कुंभार, रूपेश गिरीगोसावी, बाळासाहेब पाटील, सचिन लाड यांनी काम पाहिले. स्कोरर म्हणून महेश गिरीगोसावी तर निवेदन शिवशंकर सोनटक्के, आनंदा सुतार यांनी केले.

बक्षीस वितरण दि. प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन शिवाजी रोडे पाटील,संचालक बाळासाहेब निंबाळकर, एस व्ही पाटील,अर्जुन पाटील,सुनील एडके,गौतम वर्धन,अमर वरुटे,बाबू परीट,बाळकृष्ण हळदकर,गजानन कांबळे, वर्षा केनवडे,पद्मजा मेढे,पांडुरंग केणे,अमोल पाटील,जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे संचालक सुनील पाटील व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. राहुल सातपुते यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी उमेश कुंभार, अविनाश कुंभार, राहुल सातपुते तौसीफ पटेल, शिवशंकर सोनटक्के, भानुदास सुतार, सदाभाऊ कांबळे, सचिन भोसले, अमोल कामगोंड, अजय शिंदे यांनी योगदान दिले.

चौकट-१

नेटके नियोजन… अभूतपूर्व प्रतिसाद-शिवाजी रोडे पाटील

शिक्षकांना अशैक्षणिक
कामांचा ताण आहे. त्यामुळे अशा स्पर्धातून खेळभावना वाढीस लागून ऋणानुबंध निर्माण झाले, याचा आयोजक म्हणून खूप अभिमान आहे.या स्पर्धेसाठी माझ्या संपूर्ण टीम ने नेटके नियोजन केले.जिल्ह्यातील सर्व टीम च्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे स्पर्धा यशस्वी झाली.
—शिवाजी रोडे-पाटील,
चेअरमन दि. प्राथमिक शिक्षक बँक लि. कोल्हापूर

चौकट-२

प्रायोजकांचे ‘हात’
प्रथम क्रमांक- हेमंत भालेकर द्वितीय क्रमांक- संदीप कोटकर प्रथम क्रमांक- अर्जुन जानकर चतुर्थ क्रमांक- सहभागी चषक युवराज काटकर शरद पाटील मारुती गुरव प्राचार्य जी एस पाटील सदाशिव कांबळे
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- नाना कांबळे मालिकावीर- किरण शिंदे, मोहिते
उत्कृष्ट फलंदाज- दिलीप भोसले उत्कृष्ट गोलंदाज-आकाश पाटील सामनावीर व टोप्या- सदानंद शिंदे, सुधीर वाडीकर यांच्या वतीने संघ आणि खेळाडूवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला.

स्पर्धेसाठी हेमंत भालेकर,सदाभाऊ कांबळे,विक्रम पोतदार,आनंदा हारुगडे,प्रकाश पाटील,दिलीप भोसले,संजय पाटील,किरण शिंदे,नाना कांबळे, कलावती येळवणकर,रमेश कांबळे, अभय मोरे,उमेश कुंभार, राहुल सातपुते,अविनाश कुंभार,तौसिफ पटेल, अमोल काळे, शिवशंकर सोनटक्के,युवराज काटकर,अविनाश कुंभार,भानुदास सुतार,आनंदा सुतार,अमोल साळवे, शंकर देवकाते,अजिनाथ जाधवर आदी तसेच सर्व पदाधिकारी यशवंत पतसंस्था, शिवाजी रोडे पाटील गृह तारण पतसंस्था, राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडी शाहूवाडी,सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

चौकट-३
वैयक्तिक बक्षिसेही!

करवीर संघाचा अमर पाटील स्पर्धेतील सामनवीर, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर अशा पुरस्कारांचा मानकरी ठरला. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गगनबावडा संघाचा संजय कांबळे तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून शिरोळ संघाचा संतोष घोळवे ठरला.

(फोटो ओळी:सरूड येथे चेअरमन चषक २०२६ क्रिकेट चषकाचे विजेत्या करवीर संघास वितरण करताना शिवाजी रोडे-पाटील. सोबत शिक्षक बँकेचे संचालक मंडळ, उमेश कुंभार, अविनाश कुंभार, सदाभाऊ कांबळे, राहुल सातपुते, आनंदा सुतार, संजय जगताप, मारुती फाळके, विक्रम पोतदार आदी.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!