सुरेखा जगताप यांच्या दातृत्वाने प्रफुल्लित झाली केंद्रशाळा पट्टणकोडोलीतील मुलांची मने
सुरेखा जगताप यांच्या दातृत्वाने प्रफुल्लित झाली केंद्रशाळा पट्टणकोडोलीतील मुलांची मने
शैक्षणिक साहित्य,डोसा व गोड खिरीच्या आस्वादाने विद्यार्थ्यांनी दिला मनतृप्तीचा ढेकर!
पट्टणकोडोली/प्रतिनिधी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी… या काव्यपंक्तीला अनुसरून साजेसे कार्य करत समाजातील सामान्य परिस्थिती असणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव वेचत आणि सुखाचे दोन घास भरवत सुरेखा जगताप यांच्या दातृत्वाचा झरा केंद्रशाळा पट्टणकोडोलीमध्ये अनुभवायला आला. सुरेखा जगताप यांच्या दातृत्वाने केंद्रशाळा पट्टणकोडोलीतील मुलांची मने प्रफुल्लित झाली.
निमित्त होते सुरेखा जगताप यांच्या पतीच्या अकराव्या स्मृतिदिनाचे!
जिल्हा परिषदेतील शाळेतील मुलांनाही दर्जेदार पद्धतीचे शैक्षणिक साहित्य, दररोजच्या आहाराला फाटा देत लोणी डोशासारखा चांगला पदार्थ आणि गोड खीर देऊन त्यांनी केंद्रशाळेतल्या मुलांच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव, आशीर्वाद आणि आनंदाच्या ओथंबलेल्या नयनांनी ह्रदयाच्या कुपीत साठवून ठेवले.जणू केंद्रीय प्राथमिक शाळा पट्टणकोडोली मध्ये जणू दातृत्वाचा झराच वाहत असल्याची प्रचिती प्रत्यक्षदर्शी अनुभवायला मिळाली.
पहिली ते सातवीच्या तब्बल दोनशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, लोणी डोसा व गोड खीर देऊन सामान्य परिस्थितीतील मुलांचा भरभरून आशीर्वाद घेतला. जिल्हा परिषदेच्या शाळेत समाजातील सामान्य परिस्थिती असणाऱ्या मुलांच्याही जीवनामध्ये या प्रसंगाने समाधानाचे भाव तरललेच पण यातून समाजाला विधायक विचारांची दिशा देण्यात आली. सामान्य परिस्थिती असणाऱ्या या मुलांना सुखाचे घास व शैक्षणिक साहित्य देऊन त्यांनी संस्कारव्रत जोपासले.
या कार्यक्रमप्रसंगी सुनील भटेजा,निकिता फाळके, गावच्या प्र. सरपंच नम्रता माळी, धोंडीराम माळी, ग्रा प सदस्य शरद पुजारी, शाळा समितीचे अध्यक्ष कामाना धनगर,शिक्षणतज्ञ सिद्राम भानसे, सदस्या मनीषा हुपरे, शाळेच्या मुख्याध्यापिका मृणालीनी शिंदे, शिक्षक स्टाफ देवदत्त कुंभार, मिनाज मुजावर, संगीता कोळी, चंद्रभागा देशमुख, प्रकाश कांबळे,विकास माळगे,मारुती फाळके व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मृणालिनी शिंदे सूत्रसंचालन मारुती फाळके तर आभार देवदत्त कुंभार यांनी मानले.
चौकट-१
मुलांच्या चेहऱ्यावरचे समाधान हा मोठा आशीर्वाद
मुले दररोजच जेवणातील पदार्थ खातात या पदार्थापेक्षाही एखादा वेगळा पदार्थ देऊन मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान या उपक्रमातून मिळाल.शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याला छोटासा हातभार लावला. इथून पुढे सातत्याने समाजातील सामान्य परिस्थिती असणाऱ्या मुलांसाठी हा उपक्रम अविरत चालू ठेवणार आहे.
– सुरेखा जगताप
चौकट-२
समाजात आजही संवेदनशीलता कायम!
एकीकडे माणूसपण हरवत चाललेल्या आजच्या दुनियेमध्ये सुरेखा जगताप यांच्यासारखी संवेदनशील मनाची माणसे आजही समाजामध्ये आहेत,आणि ती भवतालाचे सूक्ष्मपणे निरीक्षण करत आहेत. सौ. सुरेखा जगताप अशा काही व्यक्तीमुळेच समाजामध्ये अजूनही माणूसपण दृढ होत असल्याचे अशा उदाहरणावरून सिद्ध होते. जगताप यांनी शाळेत दाखवलेल्या दातृत्वाबद्दल त्यांच्या ऋणात राहणे इष्ट मानतो.
–मारुती फाळके
विषय शिक्षक केंद्रशाळा पट्टणकोडोली
(फोटोओळी- केंद्र शाळा पट्टणकोडोली येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,भोजनदान समारंभावेळी सुरेखा जगताप,सुनील भटेजा,निकिता फाळके,शरद पुजारी,तुकाराम हणमंते, कामाना धनगर,सोबत मुख्याध्यापिका मृणालिनी शिंदे, देवदत्त कुंभार, मिनाज मुजावर, संगीता कोळी, चंद्रभागा देशमुख, प्रकाश कांबळे,विकास माळगे आदी.)










