March 14, 2026

जुनी पेंशन संघटनेच्या वतीने आज करवीर तालुकास्तरीय शिक्षक क्रीडा स्पर्धेचे पर्व २ चे आयोजन    बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन

0
IMG-20260103-WA0012

जुनी पेंशन संघटनेच्या वतीने आज करवीर तालुकास्तरीय शिक्षक क्रीडा स्पर्धेचे पर्व २ चे आयोजन

   बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन

कोल्हापूर/मारुती फाळके

शिक्षण विभाग पंचायत समिती करवीर व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा करवीर यांच्या संयुक्त विद्यमाने करवीर तालुक्यातील शिक्षकांसाठी एकदिवसीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन पर्व 2 रे बालिका दिनाचे औचित्य साधून आज ३ जानेवारी रोजी विद्यानिकेतन शिंगणापूर क्रीडांगणावर आयोजन केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना करवीर कार्यकारिणीने केले आहे.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर डॉ.मीना शेंडकर, करवीरचे गटविकास अधिकारी संदिप भंडारे, जि प उपशिक्षणाधिकारी आर व्ही कांबळे, शशिकांत बडे कनिष्ठ प्रशासन अधिकारी, समरजीत पाटील,करवीर गटशिक्षणाधिकारी श्रीम. अर्चना पाथरे उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेत महिला शिक्षिकांसाठी रस्सीखेच,कबड्डी, धावणे, गोळा फेक, थाळी फेक,लिंबू चमचा व 50 पेक्षा जास्त वयोगटातील महिलांसाठी 50 मीटर धावणे व 100 मीटर धावणे यांचा समावेश आहे.

पुरुष शिक्षकांसाठी रस्सीखेच,कबड्डी,धावणे, लांब उडी,उंच उडी,थाळी फेक,गोळा फेक व 50 पेक्षा जास्त वयोगट पुरुष शिक्षकांसाठी 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश केला आहे.

या स्पर्धेतील सांघिक खेळातील पहिल्या तीन विजेत्यांना चषक,वैयक्तिक खेळातील पहिल्या तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह तसेच स्पर्धेतील प्रत्येक सहभागी खेळाडू यांना सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
खास आकर्षण म्हणून संपूर्ण स्पर्धेतून एकंदरीत गुणांवरून करवीर मधील 18 केंद्रापैकी एका केंद्राला जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी भेट दिली जाणार आहे.

  स्पर्धेसाठी संतोष गायकवाड,निलेश कारंडे, संजय पाटील, बाबुराव निकम, आनंदा बनकर,अमर पाटील, नितीन कांबळे,लक्ष्मण घावटे,चेतन शिंदे,सुनिल सुतार, मिलिंद कांबळे, सचिन सुतार,अरुण टिपुगडे,विलास तोडकर, महेंद्र कांबळे, अनिल पाटील,राहुल चौगले,अमोल चव्हाण, प्रशांत देवरुखकर,राहुल झिरमिरे,संतोष फड,भोलानाथ भोसले,गोरख पाटील,दत्तात्रय शिंदे,काशिनाथ बिरुनगी, संतोष चिमले, किरण तराळ,नामदेव जाधव,मुरली कुंभार,आरती पोवार, स्नेहा माळी, जैनब शेख, सादिया मुजावर,संगिता अलगौंडर,श्रुती कुंभार, संयोगिता महाजन,स्वप्नाली कतगर, रेश्मा शेख,अनुराधा वळसंगकर, राजश्री संगशेट्टी दिपाली कतगर यांच्यासह जुनी पेन्शन संघटनेचे शिलेदार अविरत मेहनत घेत आहेत.

चौकट १.

” धावपळीच्या युगात आरोग्यदायी सवयी लागव्यात. खेळाच्या माध्यमातून आपल्याला ही आपल्या शरीराच्या वयानुरूप क्षमता जाणून घेण्यासाठी करवीर तालुक्यातील सर्व शिक्षकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.”
श्रीम. अर्चना पाथरे
गटशिक्षणाधिकारी प स करवीर

चौकट २.

“या स्पर्धेच्या माध्यमातून एक दिवस खेळातून मनमुराद आनंद लुटण्यासाठी सर्व महिला शिक्षकांनी आवर्जून या स्पर्धेत सहभागी व्हावे.”

स्नेहा माळी
महिला तालुकाध्यक्ष जुनी पेन्शन संघटना करवीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!