March 14, 2026

जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक स्पर्धेत चंदगडकर ‘ चॅम्पियन, द्वितीय राधानगरी तर तृतीय क्रमांक करवीर    ‘विद्यार्थ्यांच्या सृजनाविष्काराने’ शाहू स्मारक गाजले!

0
IMG-20251230-WA0063(1)

जिल्हा परिषदेच्या सांस्कृतिक स्पर्धेत चंदगडकर ‘ चॅम्पियन, द्वितीय राधानगरी तर तृतीय क्रमांक करवीर

   ‘विद्यार्थ्यांच्या सृजनाविष्काराने’ शाहू स्मारक गाजले

कोल्हापूर/मारुती फाळके

अत्यंत उत्कंठावर्धक,मंत्रमुग्ध वातावरणात संपन्न झालेल्या जिल्हा परिषद कोल्हापूर प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेतेपद ‘चंदगड’ तालुक्याने पटकावले असून द्वितीय ‘राधानगरी’ व तृतीय क्रमांक ‘करवीर’तालुक्याने पटकावला. कोल्हापूर येथील ऐतिहासिक शाहू स्मारक भवन येथे २ दिवस या स्पर्धा रंगल्या.या स्पर्धा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस व प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपन्न झाल्या.

शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर
जिल्हा स्तरीय सांस्कृतिक स्पर्धा सन २०२५/२६
*मोठा गट निकाल*
*कथाकथन*
१. श्रेया राजाराम पाटील, अलबादेवी ता. चंदगड.
२. श्रेया दत्तात्रय पाटील, बेलवळे खुर्द, ता. कागल
३. वेदांत विनायक बनकर, गणेशवाडीमाळ, ता. शिरोळ
*प्रश्नमंजुषा*
१. आनूर ता.कागल
२. कांडगाव ता. करवीर
३. बागीलगे ता. चंदगड
*समूहगीत*
१. पंडेवाडी, ता. राधानगरी
२.कन्या चंदगड,ता. चंदगड
३. हिरलगे ता. गडहिंग्लज
*नाट्यीकरण*
१. शिनोळी खुर्द ता. चंदगड
२. तांदूळवाडी ता. पन्हाळा
३.उर्दू घोसरवाड, ता. शिरोळ.
*समूहनृत्य*
१. कन्या चंदगड,ता. चंदगड
२. केंद्रशाळा पुनाळ, ता. पन्हाळा
३. बुगडीकट्टे, ता. गडहिंग्लज.

*लहान गट*

प्रश्नमंजुषा
१.वि म परखंदळे शाहूवाडी
२वि म होन्याळी आजरा
३.वि म गौडवाडी चंदगड

*कथाकथन*
१.वेदिका अमोल पाटील केंद्रशाळा कौलव
२.साक्षदा श्रीकांत मानकर दत्तनगर शिरोळ
३.आराध्या संतोष शिवनगेकर
शिवनगे,चंदगड

*समूहनृत्य*
१.केंद्रशाळा कालकुंद्री ता.चंदगड
२.वि म मेढेटेकवाडी ता.गगनबावडा
३.वि. म.दानेवाडी पन्हाळा

*समूहगीत*
१.चंदगड
२.गडहिंग्लज
३.म्हालसवडे

*नाट्यीकरण*
१.केंद्रशाळा गडमुडशिंगी करवीर
२.वि म पाडळी ता.राधानगरी
३.वि म मोरेवाडी पन्हाळा

 

विजेत्या स्पर्धकांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी आर व्ही कांबळे, विस्तार अधिकारी आर वाय ठोकळ,प्रसाद पाटील व मान्यवरांच्या यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 

परीक्षक महेश हिरेमठ, सिताराम जाधव, परशराम आंबी, संयोगीता महाजन,दिलीप पाटील, स्नेहल कुंभार, प्रभाकर लोखंडे, सरिता सुतार, मनीषा एकशिंगे,विजय देवणे,संजय कडगावे, नेताजी फराकटे, स्पर्धा संयोजन समितीतील रवींद्र सुर्वे,दीपक जगदाळे, शाहू बनकर, विजय गारे,मारुती फाळके, दिलीप चव्हाण राजेंद्र धनवडे,सदानंद शिंदे तसेच कार्यालयीन कर्मचारी दीपा भोसले,भारती फडणीस, मनीषा निकम, अमोल कांबळे, राजेंद्र धनवडे,मंजुषा कोठावळे,डी एच पाटील, संपत नाईक, साक्षी लगारे,राजू वडर, राजश्री निंबाळकर,पालक, विद्यार्थी, कलाकार, शाळा व्यवस्थापन प्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मगदूम व सविता कुंभार यांनी केले.

चौकट-
जिल्हा परिषद शाळा ‘लय भारी’
स्पर्धेत सादर केलेल्या विविध कलाप्रकारात विद्यार्थ्यांनी अंगभूत कलाकौशल्ये दमदाररित्या सादरीकरण करत भारत देशातल्या विविध कलाप्रकारांचे लिलया सादरीकरण केले.सभागृहाची क्षणोक्षणी वाढणारी उत्कंठा, टिपेला पोचलेली उत्सुकता आणि विद्यार्थ्यांचे भन्नाट सादरीकरण यामुळे दोन दिवस शाहू स्मारक मध्ये सृजनशील कलाविष्काराचा माहौल याची देही याची डोळा उपस्थितांना अनुभवता आला. जिल्हा परिषदेच्या शाळांनी सादर केलेल्या विविध कलाप्रकारावरून ‘जिल्हा परिषद शाळाही’ कुठेच कमी नाहीत हेच या विद्यार्थ्याने आपल्या कलाविष्कारातून दाखवून दिले. बक्षीस वितरण समारंभावेळी ‘जिल्हा परिषद शाळा लय भारी’ चा गजर वातावरणात रंग भरून गेला.

(फोटो ओळी- शिक्षण विभागाच्या वतीने सांस्कृतिक स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेतेपदाचे मानकरी चंदगड तालुक्याला गौरविताना उपशिक्षणाधिकारी आर व्ही कांबळे, विस्तारअधिकारी आर वाय ठोकळ,प्रसाद पाटील व मान्यवर.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!